Virat Kohli Hug Rahul Dravid: टी-20 विश्वचषकातील भारत पाकिस्तान (India vs Pakistan) सामना चांगलाच गाजला. मेलबर्न क्रिकेटच्या मैदानावर (MCG) खेळण्यात आलेल्या रोमहर्षक सामन्यात भारतानं पाकिस्तानचा चार विकेट्स राखून पराभव केला. भारताच्या विजयात स्टार फलंदाज विराट कोहलीनं सिंहाचा वाटा उचलला. या सामन्यात त्यानं 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. या खेळीनंतर विराट कोहली खूपच भावूक झाला. सामना संपल्यानंतर त्यानं भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडला मिठी मारली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत 


या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्मानं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधाराच निर्णय योग्य ठरवत भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या संघाला निर्धारित 20 षटकात 159 धावांवर रोखलं. अर्शदीप सिंह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमारनं उत्कृष्ट गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 50 धावांच्या आता भारतानं कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, सुर्यकुमार यादव आणि अक्षर पटेलच्या रुपात चार महत्वाचे विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संयम ठेवत भारताचा डाव पुढं नेला. त्यानंतर अखेरच्या काही षटकात दोघांनीही आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 82 चेंडूत 113 धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन गेली.  दरम्यान, अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना हार्दिक पहिल्याच चेंडूवर बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहलीनं आत्मविश्वास दाखवत भारताला विजय मिळवून दिला. 


व्हिडिओ-






 


भारत- पाक सामना पाहण्यासाठी एक लाखांहून अधिक प्रेक्षक
पाकिस्तानला पराभवाची धुळ चारल्यानंतर विराटसह भारतीय संघातील बहुतेक सगळेच खेळाडू भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांना पाहून विराट खूपच भावूक झाला. त्याचवेळी त्यानं सामना संपल्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मिठी मारली. विराटचा हा खास व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा मोठा सामना पाहण्यासाठी जवळपास एक लाखाहून अधिक प्रेक्षक मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर आले होते.


विराटनं चाहत्यांचे मानले आभार
पाकिस्तानच्या संघाला पराभवाची धुळ चारल्यानंतर विराट कोहलीनं ट्विटरच्या माध्यमातून एक पोस्ट केली. या ट्विटच्या माध्यमातून विराट कोहलीनं सर्व चाहत्यांचे आभार मानले. "एवढ्या मोठ्या संख्येनं आल्याबद्दल आमच्या सर्व चाहत्यांचे आभार", असं तो म्हणाला. या पोस्टसोबत कोहलीनं या सामन्याचे काही खास फोटोही पोस्ट केले आहेत. कोहलीचे हे ट्विट प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.


हे देखील वाचा-