T20 Women WC Live Score : भारताचा विडिंजवर सहा विकेट्सने विजय
India vs West Indies, Women T20 WC 2023 : आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारतीय महिलांचा सामना वेस्ट इंडिजच्या महिला संघासोबत होणार आहे.
कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजचा सहा विकेट्सने पराभव केला.
भारताला विजयासाठी 36 चेंडूत 27 धावांची गरज आहे. कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा मैदानावर आहेत.
लागोपाठ तीन विकेट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत आणि ऋचा घोष यांनी भारताचा डाव सावरला. ऋचा 10 तर हरमनप्रीत 15 धावांवर खेळत आहे. भारताला विजयासाठी 59 चेंडूत 52 धावांची गरज आहे.
शेफाली वर्माच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. शेफाली वर्मा 28 धावांवर बाद झाली आहे. हरमनप्रीत कौर आणि ऋचा घोष सध्या मैदानावर आहेत.
चांगल्या सुरुवातीनंतर भारताची फलंदाजी ढासळली आहे. आघाडी फळी तंबूत परतली आहे.
भारताला दुसरा धक्का, जेमिमा बाद
119 धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला पहिला धक्का बसला आहे. सलामी फलंदाज स्मृती मंधाना बाद झाली
14 आणि 15 व्या षटकात वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला. दिप्ती शर्माने आधी एकाच षटकात दोन विकेट घेतल्या. त्यानंतर दबावात आलेल्या विडिंज फलंदाजाने धावबाद होत आपली विकेट फेकली. 15 षटकानंतर वेस्ट इंडिज चार बाद 82 धावा
वेस्ट इंडिजला चौथा धक्का बसला आहे. हेनरी दोन धावांवर धावबाद झाली आहे. विडिंजच्या 4 बाद 79 धावा
दिप्ती शर्माने वेस्ट इंडिजला लागोपाठ दोन धक्के देत बॅकफूटवर ढकलले आहे. दिप्तीने शेमेन कँपबेल हिला बाद करत जोडी फोडली होती. त्यानंतर लगेच स्टॅफनी टेलर हिला बाद करत विडिंजला तिसरा धक्का दिला. दिप्तीने एकाच षटकात दोन विकेट घेत भारताला सामन्यात माघारी आणलेय.
दिप्ती शर्माने भारताला यश मिळवून दिलेय. दिप्तीने शेमेन कँपबेल हिला स्मृतीकरवी झेलबाद केलेय. स्टॅफनी टेलर आणि शेमेन कँपबेल यांनी विडिंजचा डाव सावरला होता. पण दिप्तीने मोक्याच्या क्षणी भारताला यश मिळवून दिलेय. विडिंजने 13.4 षटकात दोन बाद 77 धावा केल्या आहेत.
India Women vs West Indies Women Live: वेस्ट इंडिज संघानं दमदार सुरुवात केली आहे. दहा षटकानंतर वेस्ट इंडिज संघाने एक बाद 53 धावा केल्या आहे. स्टॅफनी टेलर आणि शेमेन कँपबेल दमदार फलंदाजी केली आहे.
India Women vs West Indies Women Live: वेस्ट इंडिजने पाच षटकानंतर एक विकेट्सच्या मोबदल्यात 29 धावा केल्या आहेत. विडिंजची कर्णधार हेले मॅथ्यूज तंबूत परतली आहे. स्टॅफनी टेलर आणि शेमेन कैंपबेल मैदानावर आहेत.
पूजा वस्त्राकरने वेस्ट इंडिजला पहिला धक्का दिला आहे. विडिंजची कर्णधार हेले मॅथ्यूज तंबूत
हेले मॅथ्यूज (कर्णधार), स्टॅफनी टेलर, शेमेन कँपबेल, शबिका गजनबी, चिनले हेनरी, चेडियन नेशन, अफी फ्लेचर, शामिलिया कॉनेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), करिश्मा रामहरैक, शकीरा सेलमैन
स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, देविका वैद्य, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंह
वेस्ट इंडिज महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आजच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पाकिस्तानला पराभव केल्यामुळे भारतीय संघाचं मनोबल वाढलं असेल तर दुसरीकडे पहिल्या विजयासाठी विडिंजचा संघ मैदानात उतरणार आहे. विडिंजला पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून पराभवाचा सामना कारावा लागला होता.
पार्श्वभूमी
India vs West Indies, Women T20 WC 2023 : आयसीसी महिला टी20 वर्ल्ड कप 2023 मध्ये आज भारतीय महिलांचा सामना वेस्ट इंडिजच्या महिला संघासोबत होणार आहे. भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली. पण आता टीम इंडियापुढे वेस्ट इंडिजचं तगडे आव्हान असेल. दक्षिण आऐफ्रिकामधील केपटाऊनच्या न्यूलँड्सच्या मैदानावर सामना होणार आहे.
टी 20 विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली पण वेस्ट इंडिज संघाला मात्र पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. विडिंजचा संघ इंग्लंड संघाकडून सात विकेट्सनं पराभव झाला होता. विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाला भारताविरोधात विजय अनिवार्य आहे. आजच्या सामन्यात पराभव झाल्यास विडिंजचं उपांत्य फेरीतील आव्हान आणखी कठीण होणार आहे.
भारतीय संघानं विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या काही षटकात धावा दिल्या. भारतीय संघाला विजयासाठी गोलंदाजीत आणखी चांगली कामगिरी करावी लागणार आहे. गोलंदाजी सुधारली नाही तर भारताच्या अडचणी वाढू शकतात. फलंदाजीत जेमिमा रोड्रिग्स आणि ऋचा घोष यांनी दमदार फलंदाजी केली आहे. त्यामुळे मध्यक्रम मजबूत दिसत आहे. त्याशिीवाय या सामन्यात सलामी फलंदाज स्मृती मंधाना परतण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे विंडीज महिला टीमकडून पहिल्या सामन्यात कर्णधार हेली मॅथ्यूज आणि कॅम्पबेल यांनी मोठी खेळी केली होती. पण इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. गोलंदाजीही सरासरी राहिली होती. वेस्ट इंडिजला विजयासाठी आपली कामगिरी सुधारण्याची गरज आहे.
कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग 11
शेफाली वर्मा, स्मृती मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कप्तान), ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि रेनुका सिंह
वेस्ट इंडीजचा संघ कसा असेल य़
हेली मॅथ्यूज (कप्तान), स्टेफनी टेलर, शेमाइनी कॅम्पबेल, शाबिका गजनबी, चिन्नेले हेनरी, चेडेन नेशन, एफी फ्लेचर, जाईदा जेम्स, शामीलिया कोन्नेल, रशादा विलियम्स (विकेटकीपर), शाकेरा सेल्मन.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -