Pakistan Team : पाकिस्तानने न्यूझीलंडचा (PAK vs NZ) पराभव करत टी-20 विश्वचषक 2022 च्या (T20 World Cup 2022) अंतिम सामन्याक धडक मारली. पाकिस्तानने सेमीफायनल अर्थात उपांत्य फेरीचा सामना 7 विकेट्सने जिंकला. त्याचबरोबर या विजयासह पाकिस्तानचा संघ फायनल सामना खेळण्यासाठी मेलबर्नला पोहोचला आहे. आता टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जाणार असून त्यामुळे पाकिस्तानचा संघ मेलबर्नला पोहोचला आहे.
टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तान संघ आता सज्ज झाला आहे. नुकतीच टीम पाकिस्तान मेलबर्नला पोहोचली असून बाबर अँड कंपनी शुक्रवारपासून येथे सराव सुरू करणार आहे. आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या निकालानंतर कळेल की अंतिम सामन्यात पाकिस्तानसमोर टीम इंडियाचं की इंग्लंडचं आव्हान असणार आहे. सध्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे. दरम्यान नुकताच पाकिस्तानचा संघ इंग्लंडला पोहोचला असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंचे एअरपोर्टवरील फोटो शेअऱ केले आहेत.
पाहा PHOTO-
PAK vs NZ सामन्याचा लेखा-जोखा
नाणेफेक जिंकत न्यूझीलंडनं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर पाकिस्तानच्या बोलर्सनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी केली. ज्यामुळे न्यूझीलंडनं सुरुवातीपासून विकेट गमावल्या. फिन अॅलन 4 तर कॉन्वे 21 धावा करुन बाद झाला. ग्लेन फिलिप्सही 6 धावांवर तंबूत परतला. ज्यानंतर मात्र केन आणि मिशेलनं डाव सावरला. केन 46 धावांवर बाद झाला तर मिशेलनं नाबाद 53 धावा केल्या. नीशमनंही नाबाद 16 धावाचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 2 तर मोहम्मद नवाजनं एक विकेट घेतली. ज्यानंतर 153 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं आज सुरुवातच दमदार केली. सलामीवीर बाबर आणि रिझवान यांना धडाकेबाज अशी अर्धशतकं ठोकली. बाबर 53 धावा करुन बाद झाला, पण त्यानंतर रिझवानने झुंज कायम ठेवली. मोहम्मद हारिसनेही 30 धावांची साथ रिझवानला दिली. रिझवाननं पाकिस्तानकडून सर्वाधिक 57 धावा केल्या. ज्यानंतर शानच्या नाबाद 3 धावांनी पाकिस्ताननं 19.1 षटकांत सामना जिंकत 7 विकेट्सनी विजय मिळवला.
हे देखील वाचा-