Sania Mirza Shoaib Malik Divorce : भारतीय टेनिसपटू ( Indian Tennis Player ) सानिया मिर्झा ( Sania Mirza ) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू ( Pakistan Cricketer ) शोएब मलिक (Sania Mirza Shoaib Malik Divorce) यांचा घटस्फोट झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक ( Shoaib Malik ) यांच्या जवळच्या एका व्यक्तीने सानिया आणि शोएब यांच्या नात्याबाबत चर्चावर शिक्कामोर्तब करत ते दोघेही विभक्त झाल्याचं सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.


दोघेही बऱ्याच काळापासून राहतायत वेगळे


शोएब मलिकच्या जवळच्या व्यक्तीने याबाबत सांगितलं आहे की, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक बऱ्याच काळ एकमेकांपासून वेगळे राहत होते. आता दोघांनी औपचारिकरित्या घटस्फोट घेतला आहे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा व्यवस्थापन सदस्य असलेल्या व्यक्तीने हा खुलासा केला आहे. 






शोएबचं अफेअर आहे घटस्फोटाचं कारण?


पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिकचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तांनुसार, शोएब मलिक सध्या एका दुसऱ्या तरुणीला डेट करत आहेत. यामुळेच सानियाने शोएबपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. पण याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


सानिया मिर्झाने शेअर केली होती भावूक पोस्ट


काही दिवसांपूवी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली होती. सानियाने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली होती. याशिवाय सानियाने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाला मुलाचा फोटो शेअर केला होता. पण शोएबचा नाही. तेव्हाच या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचं स्पष्ट झालं होतं.


सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या नात्यात दुरावा


सानिया आणि शोएब यांनी 12 एप्रिल 2010 रोजी विवाह केला होता. सानिया आणि शोएबच्या लग्न म्हणजे भारत-पाकिस्तान संबंध सुधारण्यासाठीची एक मजबूत कडी मानली जात होती. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला. या मुलाचं नाव इजहान आहे. सानिया सध्या 35 वर्षांची आहे, तर शोएब मलिक 40 वर्षांचा आहे. 


शोएब आणि सानियाच्या आयुष्यात काहीही सुरळीत हा अंदाज आता खरा ठरला आहे. सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने सांगितलं आहे की दोघांनी घटस्फोटासाठीची प्रक्रिया सुरु केली आहे आणि दोघांनाही एकमेकांपासून वेगळे राहायचे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सानिया सध्या दुबईमध्ये आहे तर शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे.