T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील पहिला सेमीफायनल सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी (9 नोव्हेबर 2022) खेळला गेला. सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा सात विकेट्सनं पराभव करत फायनलमध्ये धडक दिली. हा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका पाकिस्तानी तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी या तरूणीचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पाकिस्तानच्या या मिस्ट्री गर्लचं नाव नताशा आहे. ट्विटरवर नताशाच्या नावाचा एक ट्विटर अकाऊंट आहे, हे तिचं अधिकृत ट्विटर हँडल असल्याचही संबंधित तरूणीनं दावा केलाय.
या ट्विटर अकाउंटचे फॉलोअर्सही झपाट्याने वाढत आहेत. मात्र, हे खरंच नताशाचं अकाऊंट आहे की फेक आयडी बनवण्यात आलंय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या ट्विटर आयडीवर नताशाचे आणखी फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत.
ट्वीट-
ट्वीट-
ट्वीट-
पाकिस्तानची फायनलमध्ये धडक
टी-20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा (NZ vs PAK) सात विकेट्सनं धुव्वा उडवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननं (Kane Williamson) प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघानं निर्धारित 20 षटकात चार विकेट्स गमावून पाकिस्तानसमोर 154 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघानं 19.1 षटकातच हा सामना जिंकत फायनलमध्ये धडक दिली.
हे देखील वाचा-