T20 World Cup 2024 IND vs PAK: क्रिडाविश्वात टी20 वर्ल्डकपचं (T20 World Cup 2024) बिगुल वाजलं आहे. जूनपासून टी20 विश्वचषकाचा महासंग्राम सुरू होणार आहे. यामध्ये टीम इंडिया (Team India) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी (Team India vs Ireland) होणार आहे. दोन्ही संघांमधील सामना न्यूयॉर्कमध्ये (New York) 5 जूनला खेळवला जाणार आहे. यानंतर मात्र चाहते ज्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत, तो हायव्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे.
9 जून रोजी टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Team India vs Pakistan) सामन्याची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील भिडत म्हणजे, क्रिडाप्रेमींसाठी आणि त्यातल्या त्यात भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. यामुळेच या सामन्याची तिकिटं मिळवणं तसं फारसं कठीण जातं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्याच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. एका वेबसाईटवर टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांची लाखो रुपयांना विक्री होत आहे.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामना 9 जूनला
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सामन्याच्या तिकिटाची सुरुवातीची किंमत फक्त 500 रुपये होती. अधिकृत विक्रीसाठी ही किंमत आहे. मात्र, त्यानंतर या सामन्याच्या तिकिटाचे दर गगनाला भिडू लागले. टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यासाठी व्हीआयपी तिकिटाची सुरुवातीची किंमत सुमारे 400 डॉलर असल्याचं सांगितलं जात आहे. 400 डॉलर्स म्हणजे, भारतीय किमतींत सुमारे 33 हजार रुपये असेल. दुसऱ्या वेबसाईटवर ती तिकीटं 40 हजार डॉलर्समध्ये विकली जात आहेत. 40 हजार डॉलर्स म्हणजे, भारतीय किमतींत सुमारे 33 लाख रुपये.
SeatGeek नावाची एक अमेरिकन वेबसाईट आहे. खेळांसोबतच इतर कार्यक्रमांची तिकिटंही त्यावर विकली जातात. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तिकीटांची किंमत लाखात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, तिकिटाचे दरही काळानुरूप वाढत आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या दोन तिकिटांसाठी सध्या सीटगीटवर 179.5 हजार डॉलर्स आकारले जात आहेत. तुम्ही तिकीट खरेदी करता, तेव्हा तुम्हाला त्यावर टॅक्सही भरावा लागेल. अशा प्रकारे तिकिटाची किंमत 50-60 लाखांच्या पुढे जाईल.
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात अनेक दिवसांपासून द्विपक्षीय सीरिज खेळली जात नाही. पण हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेत एकत्र खेळताना दिसतात. 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा सामना खेळला गेला होता. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :