Adelaide Weather Updates: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ आज टी-20 विश्वचषकातील चौथा सामना बांग्लादेश (India vs Bangladesh) विरुद्ध खेळणार आहे. हा सामना एडिलेडच्या(Adelaide) मैदानावर खेळला जाणार असून येथे पावसाची शक्यता वर्तवली जात होती. ज्यामुळं भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना रद्द केलं जाण्याची भिती व्यक्त  केली जात होती. मात्र, याचदरम्यान एडिलेड येथील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. एडिलेडमध्ये सकाळपासून पाऊस पडला नाही.तसेच आज दिवसभर पाऊस पडणार नाही, असा अंदाज वर्तवला जात आहे. भारतीय वेळेनुसार, भारत आणि बांग्लादेश यांच्यातील सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. यापू्र्वी अर्धातास नाणेफेक होईल. 


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या काही वेळ अॅडलेड येथील तापमना 13-15 डिग्री सेल्सिअस असेल. मागील दोन दिवसांपासून एडिलेड येथील वातावरण खूप खराब होतं.ज्यामुळं दोन्ही संघ इंडोर सराव करत होती. परंतु, आता रात्री 8 वाजेपर्यंत पावसाची शक्यता कमी आहे. तर, हवेचा वेग 25-35 किलोमीटर प्रतितास असेल आणि आर्द्रता 60 टक्के राहील.


स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजचा सामना महत्वाचा
टी-20 विश्वचषकातील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आणि सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारताचा बांगलादेशविरुद्धचा विजय महत्वाचा आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी दोन सामने भारतानं जिंकले आहेत. तर, एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. बांग्लादेशनंतर भारतीय संघ सुपर 12 फेरीतील अखेरचा सामना झिम्बाब्वे विरुद्ध खेळणार आहे, जो सामना 6 नोव्हेंबरला होईल. सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी भारताला पुढील दोन्ही सामने जिंकणं अनिवार्य आहे.


कधी, कुठं रंगणार सामना?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सुपर-12 मधील पहिला सामना शनिवारी 02 नोव्हेंबर रोजी एडिलेड क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. तर, अर्धातास पूर्वी नाणेफेक होईल. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेलवर पाहता येईल, जिथे विविध भाषांमध्ये कॉमेन्ट्री ऐकायला मिळू शकते. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार अॅपवर पाहू शकतात. तसेच टी-20 विश्वचषकाच्या संबंधित ताज्या बातम्या वाचण्यासाठी तुम्ही एबीपी माझाच्या वेबसाईटवर भेट देऊ शकतात.


हे देखील वाचा-