IND vs BAN Toss Update : भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) सामन्याला काही मिनिटांत सुरुवात होत असून नुकतीच नाणेफेक पार पडली आहे. भारताने आज मात्र नाणेफेक गमावली असून बांग्लादेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. याआधी भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड संघाला मात दिली असून बांग्लादेशनेही दोन विजय मिळवले आहेत. दोघांना प्रत्येकी एक सामना गमवावाही लागला आहे. ज्यानंतर दोघेही आपला सुपर 12 मधील चौथा सामना आज खेळणार आहेत. सेमीफायनलमध्ये एन्ट्रीसाठी दोन्ही संघाना आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण आज जिंकणारा संघच सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकणार असून दुसऱ्या संघाचा प्रवास अत्यंत खडतर होईल.


दरम्यान टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि बांग्लादेश संघ यांच्यात आतापर्यंत 11 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं कमालीचं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 11 पैकी 10 सामन्यात विजय मिळवलाय. तर, बांग्लादेश संघाला फक्त एक सामना जिंकता आला आहे. त्यामुळे आज भारत सामना जिंकण्यासाठी सर्व प्रयत्न नक्कीच करेल पण बांग्लादेशचं आव्हान भारतासाठी नक्कीच अवघड असेल.






भारतीय संघानं आज अंतिम 11 मध्ये एक बदल केला आहे. दीपक हुडाच्या जागी पुन्हा एकदा अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. बांग्लादेश संघानेही एक बदल करत सौम्या सरकारच्या जागी शोरीफुल इस्लामला संधी दिली आहे.


असे आहेत दोन्ही संघ?


भारत: रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.


बांग्लादेश: नजमुल हुसैन शान्तो, शोरीफुल इस्लाम, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसादेक हुसैन, नूरुल हसन (विकेटकीपर), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्कीन अहमद