Ruturaj Century in Syed Mushtaq Ali Trophy 2022 : एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु असून दुसरीकडे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2022 (Syed Mushtaq Ali Trophy 2022) सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रा संघाचा कर्णधा ऋतुराज गायकवड (Ruturaj Gaikwad) कमाल फॉर्ममध्ये असून त्याने नुकतंच दुसरं शतक ठोकलं आहे. आधी 24व्या सामन्यात सर्व्हिसेस विरुद्ध 112 धावांची खेळी केल्यानंतर आता केरळविरुद्ध त्याने  68 चेंडूत 114 धावा करत आणखी एक दमदार शतक ठोकलं आहे. 


विशेष म्हणजे या शतकाच्या मदतीने त्याने या स्पर्धेत एकापेक्षा अधिक शतक ठोकत दमदार खेळाडूंच्या यादीत नाव मिळवलं आहे. त्याने कोहली, शर्मा यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. दरम्यान या यादीत उन्मुक्त चंदच्या नावावर सर्वाधिक 3 शतकं आहेत. तर ईशान किशन, करुण नायर, मनिष पांडे, श्रेयस अय़्यर आणि आता ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर दोन शतकं आहेत. ऋतुराजचा फॉर्म पाहता तो आगामी मालिकेत पुन्हा टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल अशी आशा आहे.


महाराष्ट्राचा विजय


याशिवाय सामन्याचा विचार केल्यास महाराष्ट्राच्या संघाने (Team Maharashtra) प्रथम फलंदाजी करत ऋतुराजच्या दमदार शतकाच्या जोरावर 4 बाद 167 धावांपर्यंत मजल मारली. ज्यानंतर 20 षटकांत 168 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या केरळच्या फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही. केरळकडून केवळ रोहन कुन्नुमलने 58 धावांची एकहाती झुंज दिली पण त्याला खास कोणाची साथ न मिळाल्याने केरळचा संघ या लक्ष्याचा पाठलाग करताना 20 षटकांत 127 धावांवर 8 बाद इतकीच मजल मारु शकला. ज्यामुळे 40 धावांनी सामना महाराष्ट्र संघाने जिंकला.


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून वगळलं


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकत्याच खेळवल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ऋतुराज गायकवाड भारतीय संघाचा भाग होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला संधी देण्यात आली होती. मात्र, या सामन्यात त्यानं संथ खेळी केली. त्यानं 42 चेंडूत अवघ्या 19 धावांची खेळी केली. त्यानंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यातून त्याला वगळण्यात आलं. 


हे देखील वाचा-