T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकातील पात्रता फेरीतील सामन्यांना 16 ऑक्टोबरपासून सुरुवात झालीय. या स्पर्धेच्या सुपर-12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी अनेक संघ एकमेंकाना झुंज देताना दिसत आहेत. दरम्यान, पात्रता फेरीतील सहाव्या सामन्यात श्रीलंका आणि यूएईचा संघ आज आमने- सामने आले. हा सामना श्रीलंकानं 79 धावांनी जिंकला. या सामन्यात यूएईचा क्रिकेटपटू बासिल हमीदनं चित्त्यासारखी झेल घेऊन श्रीलंकेचा सलामीवीर पाथुन निसांकाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.


श्रीलंकेच्या डावातील अखेरच्या षटकात यूएईचा गोलंदाज जहूर गोलंदाजी करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज पाथुम निसांकानं फटका मारला. या चेंडू जमीनीवर पडण्याअगोदर बासिल हमीदनं हवेत उडी घेऊन झेल घेतला. बासिलनं घेतलेल्या या झेलचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. 


व्हिडिओ-






 


श्रीलंकेची आक्रमक फलंदाजी
सामन्यात आधी टॉस जिंकत युएई संघाने गोलंदाजी निवडली. ज्यानंतर श्रीलंकेची सुरुवातही दमदार झाली त्यांचा सलामीवीर पाथुम निसांकाने सुरुवातीपासून तुफान खेळी कायम ठेवली. कुसल मेंडीस 18 धावा करुन बाद झाला. मग धनजंया डी सिल्वाने 33 धावांची तडाखेबाज खेळी केली. तो बाद झाला तरी पाथुम क्रिजवर कायम होता. त्यानंतर मात्र युएईच्या कार्तिकने तीन गडी सलग बाद करत दमदार सुरु असलेला श्रीलंकेचा खेळ रोखला. पाथुमने सामन्यात 60 चेंडूत 74 धावांची खेळी केली. ज्याच्या जोरावर श्रीलंका संघाने 152 धावा स्कोरबोर्डवर लावल्या.


यूएईचा 79 धावांनी पराभव
153 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या युएई संघाचे फलंदाज मात्र साफ फेल झाल्याचं दिसून आलं. त्याच्या अयान अफझल खानने सर्वाधिक 19 तर जुनेद सिद्दीकने 18धावा केल्या. इतर फलंदाज स्वस्तातच तंबूत परतल्याने युएईचा संघ 17.1 षटकात 73 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना श्रीलंकेने 79 रनांनी जिंकला. विशेष म्हणजे युएईच्या कार्तिकनं हॅट्रिक घेऊनही फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे सामना युएईला गमवावा लागला. त्यामुळे सामनावीराचा पुरस्कार कार्तिकला न मिळता 74 धावा करणाऱ्या श्रीलंकेच्या पाथुमला मिळाला.


कार्तिकची हॅट्ट्रीक
श्रीलंकाविरुद्ध आज खेळल्या गेलेल्या सामन्यात यूएईची कार्तिक मय्यपननं श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक घेऊन इतिहास रचला. या स्पर्धेत हॅट्ट्रीक घेणारा कार्तिक मय्यपन पहिला आणि जगातील पाचवा गोलंदाज ठरला आहे. चेन्नईमध्ये जन्मलेला आणि यूएईच्या संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कार्तिकनं जगाचं लक्ष वेधून घेतलंय. यापूर्वी ब्रेट ली (2007), कर्टिस कॅम्फर (2021), वानिंदु हसरंगा (2021), कगिसो रबाडा (2021) यांनी टी-20 विश्वचषकात हॅट्रीक घेण्याचा पराक्रम केलाय. 


हे देखील वाचा-