India vs Pakistan, ICC ODI World Cup 2023 : आज एकदिवसीय विश्वचषकातील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामना रंगणार आहे. भारतात विश्वचषक होत असल्याने भारतीयांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातह आज किक्रेटमधील हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे. भारत आणि पाकिस्तानची टशन आज क्रिकेटच्या मैदानात दिसून येणार आहे. विश्वचषकात भारताची सुरुवात चांगली झाली. भारताने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र, टीम इंडियाचा सलीमीवीर शुभमन गिल पहिल्या दोन सामन्याला मुकला. आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात शुभमन गिलवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. शुभमन गिल आजच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 


टीम इंडियाचा स्टार सलामीवीर सज्ज


टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे शुभमन गिल डेंग्यूतून बरा झाल्यानंतर टीम इंडियासोबत सराव करताना दिसला. शुभमन गिलने गुरुवारी सकाळी एक तासभर फलंदाजीचा सराव केला. अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाला त्याची गरज भासणार आहे. दरम्यान, पाकिस्तानविरोधातील सामन्यासाठी शुभमन गिल उपलब्ध असल्याची माहिती कर्णधार रोहित शर्मा याने दिली आहे. शुभमन गिल 99 टक्के खेळण्यास तयार असल्याचे कर्णधार रोहित शर्मा याने सांगितले.






शुभमन गिलबाबत रोहित शर्मा काय म्हणाला?


कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानविरोधातील सामन्यासाठी शुभमन गिल 99 टक्के तयार आहे. रोहित शर्माने पत्रकार परिषदेमध्ये शुभमन गिलच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली. शुभमन गिल खेळण्यासाठी तयार असल्याचे रोहित शर्माने सांगितलं. डेंग्यूची लागण झाल्यामुळे शुभमन गिल विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्याला मुकला होता. पण आता त्याने डेंग्यूवर मात केली आहे. तो लवकरच मैदानावर परतणार आहे, असं रोहितने सांगितलं. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात गिल मैदानात उतरल्यास भारताच्या फलंलादाजीची ताकद आणखी वाढणार आहे. 






डेंग्यूतून सावरल्यानंतर शुभमन गिल मैदानावर परतणार


टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) ला डेंग्यूची लागण झाली होती. प्लेटलेट्स (Platlets) कमी झाल्यामुळे सोमवारी त्याला चेन्नईमधील रुग्णालयात (Chennai Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज (Shubman Gill Discharged) देण्यात आला. त्यानंतर चेन्नईहून अहमदाबादमध्ये पोहोचला. 13 ऑक्टोबरला शुभमन गिल टीम इंडियासोबत सराव करतान दिसला. गिल मैदानावर परतण्यासाठी सज्ज झाला आहे.