India vs Pakistan, World Cup 2023 : आज विश्वचषक 2023 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान 'काँटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हा सामना रंगणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना म्हटलं की, हाय व्होल्टेज ड्रामा समजला जातो, त्यामुळे भारतीय संघाकडून क्रिकेट प्रेमींना भारतीय खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा निर्माण होतात. देशभरातून मोठ्या संख्येने भारतीय क्रिकेट प्रेमी अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. या सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. सचिन तेंडुलकरने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या आधी 'एबीपी माझा'ला मराठमोळी प्रतिक्रिया ही दिली आहे.


भारत-पाकिस्तान सामन्यावर सचिनची मराठमोळी प्रतिक्रिया


भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबल्यासाठी सचिन तेंडुलकर भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे. यावेळी त्याने 'एबीपी माझा'ला मराठमोळी प्रतिक्रिया दिली आहे. आपण भारतीय संघाला समर्थन देण्यासाठी आलं असल्याचं सचिन तेंडुलकरनं सांगितलं. यावेळी सचिन तेंडुलकरने प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं की, ''मी इथे टीमला सपोर्ट करायला आलो आहे, आशा आहे की, आपण सर्वांना हवा तोच निकाल लागो.''




विश्वचषकात भारतच भारी 


वनडे इतिहासात पाकिस्तान संघाचे पारडे जड असले तरी विश्वचषकात भारतच वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये सातवेळा सामना झाला आहे. या  सर्व 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे.  पाकिस्तानला विश्वचषकातील एकही सामना जिंकता आला नाही.  2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करत भारत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर पाकिस्तान विश्वचषकातील पराभवाचा सिलसिला तोडण्यासाठी मैदानात उतरेल.


पाहा व्हिडीओ : भारत-पाकिस्तान सामन्यावर सचिनची मराठमोळी प्रतिक्रिया



वनडेत कोणत्या संघाचे पारडे जड


भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 134 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने 73 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने 56 सामन्यात बाजी मारली आहे. म्हणजेच, आतापर्यंतच्या वनडे सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध 73 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. ही आकडेवारी पाहता एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं पारडे जड असल्याचे दिसतेय.  5 सामन्याचा निकाल लागलेला नाही.


महत्वाच्या इतर बातम्या : 


गिल खेळणार? महामुकाबल्यासाठी कशी असेल भारत आणि पाकिस्तानची प्लेईंग 11, कुणाला मिळणार संधी?