Team India for T20 World Cup 2022 : भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket Team) एक दिग्गज आणि अनुभवी गोलंदाज म्हटलं तर मोहम्मद शमी (Mohammed Shami). डावाच्या सुरुवातीलाच नाही तर डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी करण्याची ताकद शमीमध्ये आहे. पण युवा खेळाडूंच्या संघात आल्यानंतर हळूहळू मागे पडू लागलेला शमी नुकत्याच टी20 विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या संघातही नसल्याचं समोर आलं आहे. पण शमी यंदाच्या टी20 विश्वचषकात खेळू शकण्याची शक्यता अजूनही आहे. हे शमीच्या खेळावर तसंच बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून आहे.
तर नेमकी गोष्ट अशी आहे की, भारत आता आगामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियाची विश्वचषकापूर्वी ही एकप्रकारची रंगीत तालिम असणार आहे. या दोन्ही दौऱ्यांमध्ये मोहम्मद शमी संघात आहे. त्यामुळे विश्वचषकापूर्वी शमी कशी कामगिरी करतो याकडे अनेकांचं लक्ष आहे. त्यात विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक आठवड्यापर्यंत संघात बदल केला जाऊ शकतो आणि राखीव खेळाडूंमधील खेळाडूला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शमीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केल्यास त्याला विश्वचषकाच्या संघात जागा मिळू शकते.
कसा आहे भारतीय संघ?
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया...
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
राखीव खेळाडू
मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर
टी-20 विश्वचषक 2022 साठी16 संघ पात्र
आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यूएईनं आधीच आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये आपली जागा पक्की केलीय.
हे देखील वाचा-