T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट बोर्डानं 15  सदस्यीय संघाची घोषणा केलीय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघात ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि दिनेश कार्तिक (Denesh Karthik)  या दोन्ही विकेटकीपर फलंदाजांना संधी देण्यात आलीय. तर, दुखापतग्रस्त रवींद्र जडेजाच्या जागी डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलला संघात स्थान मिळालंय. दरम्यान, टी-20 विश्वचषकात भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात असताना आस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसननं भारताच्या संघ निवडीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतानं उसळत्या खेळपट्ट्यांसाठी कमी वेगवान गोलंदाजांची निवड केलीय, असं त्यानं म्हटलंय.


मिचेल जॉन्सननं म्हणाला की "जर तुम्ही संघात एक अष्टपैलू (वेगवान गोलंदाज), दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाज ठेवले असतील तर, हे थोडे धोक्याचं ठरू शकतं. पण भारत दोन वेगवान गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू (हार्दिक पांड्या) आणि दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा विचार करत आहे."ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर तुमच्या संघात तीन वेगवान गोलंदाज असणं आवश्यक आहे. पर्थच्या खेळपट्टीवर तुमच्या संघात चार वेगवान गोलंदाज असणं गरजेचं आहे. टी-20 विश्वचषकात भारतानं विचारपूर्वक संघाची निवड केली असेल, पण फक्त चार गोलंदाजांचं संघात समावेश करणे, संघासाठी धातक ठरण्याची शक्यता आहे. 


ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाची जबाबदारी कोणाकडं सोपवावी?
ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू आरोन फिंचनं एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. ज्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाची धुरा कोण संभाळणार? याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर सर्वात पुढं आहेत. परंतु, एका युवा क्रिकेटपटूकडं संघाचं नेतृत्व सोपवण्यात यावं, अशी मागणी जॉनसननं केलीय. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोन्ही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असल्यानं एका युवा खेळाडूकडं संघाची धुरा सोपवण्यात यावी, असं जॉनसन म्हणाला आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सकडं सर्व सर्व फॉरमॅटची जबाबदारी दिल्यानं त्याच्यावरचा ताण वाढेल. ग्लेन मॅक्सवेलचं नाव निवडकर्त्यांच्या मनात असू शकतं. भविष्याचा विचार केल्यास कॅमेरून ग्रीन हा देखील एक चांगला पर्याय असेल. "वॉर्नर आणि स्मिथ दोघेही कर्णधार नसावेत. हे दोघेही पूर्वीप्रमानं संघाला मार्गदर्शन करू शकतात.यांपैकी कोणीही कर्णधार झाल्यास पुन्हा बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या चर्चेला सुरुवात होईल.


टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ- 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह. राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.


हे देखील वाचा- 


Umesh Yadav Injury : भारतीय गोलंदाज उमेश यादव दुखापतग्रस्त, मोठ्या स्पर्धेला मुकणार


India Maharajas vs World Giants : पठाण बंधूंची कमाल! इंडिया महाराजा संघाचा 6 विकेट्सनी वर्ल्ड जायंट्सवर विजय