IND vs BAN, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) स्पर्धेत भारतानं आज बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवत ग्रुप 1 मध्ये आघाडीचं स्थान घेतलं आहे. विशेष म्हणजे आजचा सामना अगदी रंगतदार झाला. कधी भारताच्या तर कधी बांगलादेशच्या बाजूनं सामना झुकत होता. त्यात पावसानं देखील हजेरी लावल्यानं आधी सामना थांबवण्यात आला होता, मग डीएलएस मेथडने बांगलादेशसमोर 16 षटकांत 151 धावा करण्याचं आव्हान आलं. जे पूर्ण करताना भारतानं विकेट्सचा पाऊस पाडायला सुरुवात केली पण अखेरपर्यंत बांगलादेशनं कडवी झुंज दिली, पण अखेर सामना भारतानं 5 धावांनी जिकला. तर या अटीतटीच्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...


IND vs BAN 10 महत्त्वाचे मुद्दे-



  1. सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. पण आज मात्र नाणेफेक जिंकूनही बांगलादेशनं सामना गमावला आहे. 

  2. सामन्याबद्दल बोलायचं झालं बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

  3. ज्यानंतर भारतानं फलंदाजीला येत 185 धावाचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं. 

  4. भारताची सुरुवातच खराब झाली पण केएल राहुल आणि विराटनं अर्धशतकं झळकावली तर सूर्यकुमारनंही 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

  5. ज्यानंतर 185 धावा करण्यासाठी बांगलादेशचा संघ मैदानात आला आणि त्यांनी दमदार सुरुवात केली.

  6. सलामीवीर लिटन दासनं 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. पण 7 ओव्हर झाल्या असताना पाऊस आला आणि 66 धावांवर सामना थांबला.

  7. पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला पण पावसामुळे DLS मेथड वापरण्यात आली आणि सामना 16 ओव्हर्सचा कऱण्यात आला आणि बांगलादेशचं टार्गेटही 151 करण्यात आलं.

  8. ज्यामुळे बांगलादेशला 54 बॉलमध्ये 85 रन करायच्या होत्या. पण सामना सुरु होताच आश्विनच्या 8 व्या षटकात केएलनं दासला रनआऊट केलं आणि बांगलादेशच्या खेळाडूंची बाद होण्याची लाईनच लागली.

  9. एक-एक खेळाडू तंबूत परतत होते. पण यष्टीरक्षक नुरुल हसन आणि तस्किन यांनी अखेरच्या काही षटकात सामना फिरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चौकार, षटकार ठोकत त्यांनी सामना फिरवत आणला होता. पण अखेरच्या षटकात अर्शदीपनं संयमी गोलंदाजी करत अखेर सामना भारताला 5 धावांनी जिंकवून दिला.

  10. सामनावीर म्हणून भारताकडून नाबाद 64 धावा करणाऱ्या विराट कोहलीला गौरवण्यात आलं. 


हे देखील वाचा-