IND vs BANG, Match Highlights : टी20 विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) सामना कमालीचा रोमहर्षक झाला. दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून दमदार खेळ, मग पावसाचा व्यत्यय, ओव्हर्ससह टार्गेटमध्ये बदल झाल्यानंतर अखेर भारतानं 5 धावांनी सामना जिंकला आहे. त्यामुळे अगदी रोलरकोस्टर राईडप्रमाणे झालेला सामना अखेर भारताच्या बाजूने झुकला. आधी फलंदाजी करत भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या बांगलादेशनं सुरुवात चांगली केली. सलामीवीर लिटन दासनं एकहाती सामना बांगलादेशला जिंकवण्याचा संपूर्ण प्रयत्न केला, पण केएलनं केलेनं 8 व्या षटकांत केलेल्या एका थरारक थ्रोनं दासला धावचीत केलं आणि तिथून सामना फिरला. पाऊस थांबल्यावर DLS मेथडनुसार बांगलादेशला 16 षटकात 151 धावा करायच्या होत्या. पण भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळं 16 षटकात बांगलादेश 145 धावाच करु शकला आणि ज्यामुळं भारतानं 5 धावांनी जिंकला. 


नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. भारताचा कर्णधार रोहित अवघ्या 2 धावांवर तंबूत परतला. सलामीवीर राहुलही तसा हळू-हळू खेळत होता. पण विराट जोडीला आला आणि राहुल-विराटने फटकेबाजी सुरु केली.  50 धावा करुन राहुल बाद झाला, त्यानंतर सूर्यकुमारनेही 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मात्र पांड्या, अक्षर, कार्तिक स्वस्तात बाद झाले. अखेर आश्विनने 6 बॉलमध्ये नाबाद 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या दुसरीकडे किंग कोहलीच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. बांगलादेशकडून हसन महमूदनं 3 तर कर्णधार शाकीब अल् हसननं 2 विकेट्स घेतल्या.


ज्यानंतर बांग्लादेशचा संघ 185 धावा करण्यासाठी मैदानात उतरला त्यांनी सलामीवीर लिटन दासच्या फटकेबाजीवर दमदार सुरुवात केली.दासनं 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. पण 7 ओव्हर झाल्या असताना पाऊस आला आणि 66 धावांवर सामना थांबला. पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला पण पावसामुळे DLS मेथड वापरण्यात आली आणि सामना 16 ओव्हर्सचा कऱण्यात आला आणि बांगलादेशचं टार्गेटही 151 करण्यात आलं. ज्यामुळे बांगलादेशला 54 बॉलमध्ये 85 रन करायच्या होत्या. पण सामना सुरु होताच आश्विनच्या 8 व्या षटकात केएलनं दासला रनआऊट केलं आणि बांगलादेशच्या खेळाडूंची बाद होण्याची लाईनच लागली. एक-एक खेळाडू तंबूत परतत होते. पण यष्टीरक्षक नुरुल हसन आणि तस्किन यांनी अखेरच्या काही षटकात सामना फिरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. चौकार, षटकार ठोकत त्यांनी सामना फिरवत आणला होता. पण अखेरच्या षटकात अर्शदीपनं संयमी गोलंदाजी करत अखेर सामना भारताला 5 धावांनी जिंकवून दिला. सामनावीर म्हणून भारताकडून नाबाद 64 धावा करणाऱ्या विराट कोहलीला गौरवण्यात आलं.


केएलचा तो रनआऊट ठरला टर्निंग पॉईंट


पाऊस थांबल्यावर सामना पुन्हा सुरु झाला. बांगलादेशच्या ओव्हर कमी केल्या असल्या तरी टार्गेटही कमी झालं होतं आणि लिटन दास कमाल फॉर्मात होता. गोलंदाजीला आश्विन आला आणि दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुलनं सीमारेषेवरुन टाकलेला एक थ्रो थेट नॉनस्ट्राईकरजवळील स्टम्प्सला लागला. दास बाद झाला आणि बांगलादेशचं गणितच बिघडलं त्यांचे एक-एक गडी बाद होऊ लागले. ज्यानंतर अखेर सामना भारतानं 5 धावांनी जिंकला.


हाच तो सामना बदलवणारा रनआऊट