T20 World Cup 2022: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज टी-20 विश्वचषकातील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला जातोय. टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्हा संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. एडिलेड येथे खेळल्या जाणाऱ्या पावसानं व्यत्यय आणलं आहे. नाणेफेक गमावल्यानंतर भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात बांगलादेशसमोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या संघानं 7 षटकात 66 धावा केल्या. मात्र, त्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून या सामन्यात बांगलादेशचा संघ डकवर्थ लुईसच्या नियमांतर्गत 17 धावांनी पुढं आहे. 


ट्वीट-






 


भारताचं बांगलादेशसमोर 185 धावांचं लक्ष्य
या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताला कमी धावात रोखण्याचा बांगलादेशच्या संघाचा प्लॅन होता. त्यानंतर रोहित शर्माला अवघ्या दोन धावांवर बाद करत बांगलादेशच्या गोलंदाजांनी कर्णधार शाकीब उल हसनचा निर्णय योग्य ठरवला.मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि केएल राहुलनं आक्रमक फलंदाजीला सुरुवात केली.दरम्यान, दहाव्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर केएल राहुल 50 धावांवर बाद झाला. सूर्यकुमारने 30 धावांचं योगदान दिलं.त्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि दिनेश कार्तिक स्वस्तात माघारी परतले. अखेर आश्विननं सहा बॉलमध्ये नाबाद 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या दुसरीकडे विराट कोहलीच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारतानं बांगलादेश समोर 185 धावांचं लक्ष्य ठेवलं.


विराटची टी-20 विश्वचषकातील जबरदस्त कामगिरी
विराट कोहलीनं यंदाच्या टी-20 विश्वचषकाची सुरुवात 845 धावांपासून केली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 12 धावांची खेळी करण्यापूर्वी त्यानं पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्ध नाबाद अर्धशतकी खेळी केली. या कामगिरीसह त्यानं तिलकरत्ने दिलशान (897 धावा), रोहित शर्मा (904 धावा) आणि ख्रिस गेल (965 धावा) यांना मागं टाकून टी-20 विश्वचषकातील सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. त्यानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यादरम्यान त्यानं नाबाद 65 धावांचं योगदान देत जयवर्धनेचा विक्रम मोडला.


हे देखील वाचा-