ICC T20 WC 2022, IND vs BAN : टी20 विश्वचषक स्पर्धेत सुरु भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. भारताची फलंदाजी होऊन भारतानं 185 धावांचं टार्गेट बांगलादेशला दिलं होतं. दरम्यान बांगलादेशच्या 7 ओव्हर्स खेळून झाल्यावर पाऊस आला, ज्यानंतर आता सामना पुन्हा सुरु होत असून 16 ओव्हर्सचा खेळ कऱण्यात आला आहे. तसंच बांगलादेशचं टार्गेटही 151 करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बांगलादेशला 54 बॉलमध्ये 85 रन करायचे आहेत. 


भारतानं प्रथम फलंदाजी करत राहुल आणि विराटच्या शतकाच्या जोरावर 184 रन करत 185 धावाचं टार्गेट बांगलादेशसमोर ठेवलं. तसं टार्गेट मोठं असतानाही बांगलादेशनं सलामीवीर लिटन दासच्या जीवावर दमदार सुरुवात केली. दासनं पहिल्या ओव्हरपासूनच फटकेबाजी करायला सुरुवात केली. ज्यामुळं अवघ्या 21 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. सोबतीचा नजमूल तसा सावध खेळत होता. लिटनच्या या दमदार सुरुवातीमुळे बांगलादेशनं चांगली सुरुवात केली.






भारतानं केल्या 184 धावा


सामन्यात सर्वात आधी बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताला कमी धावांत रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण लवकर करायचा प्लॅन त्यांनी आखला होता. त्यानुसार बांगलादेशनं  भारताचा कर्णधार रोहितला अवघ्या 2 धावांवर तंबूतही धाडलं. राहुलही तसा हळू-हळू खेळत होता. पण विराट जोडीला आला आणि राहुल-विराटने फटकेबाजी सुरु केली.  50 धावा करुन राहुल बाद झाला, त्यानंतर सूर्यकुमारनेही 30 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर मात्र पांड्या, अक्षर, कार्तिक स्वस्तात बाद झाले. अखेर आश्विनने 6 बॉलमध्ये नाबाद 12 महत्त्वपूर्ण धावा केल्या दुसरीकडे किंग कोहलीच्या नाबाद 64 धावांच्या जोरावर भारतानं 184 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आता बांग्लादेशचा संघ 185 धावा करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. बांगलादेशकडून हसन महमूदनं 3 तर कर्णधार शाकीब अल् हसननं 2 विकेट्स घेतल्या.