IND vs PAK LIVE Score : भारताचा पाकिस्तानवर 7 विकेटने विजय

IND vs PAK WC 2023 LIVE Score Updates : पाकिस्तानला आठव्यांदा नमवण्यासाठी टीम इंडिया आज अहमदाबादच्या मैदानात उतरत आहे. या सामन्याच्या लाईव्ह अपडेट एका क्लिकवर...

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क Last Updated: 14 Oct 2023 08:05 PM
भारताचा पाकिस्तानवर 7 विकेटने विजय

भारताचा पाकिस्तानवर 7 विकेटने विजय

रोहित शर्माचे शतक हुकले

भारताला तिसरा धक्का बसलाय. रोहित शर्मा 86 धावांवर बाद झालाय

रोहित शर्माचे अर्धशतक

36 चेंडूत रोहित शर्माने ठोकले अर्धशतक

भारताला दुसरा धक्का

शुभमन गिल याच्यानंतर विराट कोहली बाद झला. विराट कोहली 18 धावांवर बाद झाला. भारत 2 बाद 79 धावा... 

भारताला विजयासाठी 192 धावांचे माफक आव्हान

IND vs PAK : भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी भारताच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्कारली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 42.4 षटकात 191  धावांपर्यंत मजल मारु शकला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझम याने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. त्याशिवाय मोहम्मद रिजवान याने 49 धावांचे योगदान दिले. भारताकडून बुमराह, सिराज, हार्दिक अन् कुलदीप यांनी भेदक मारा केला. भारताला विजयासाठी 192 धावांचे आव्हान आहे. 

हसन अलीही बाद

पाकिस्तानला नववा धक्का... हसन अली 12 धावांवर बाद.. जाडेजाने घेतली विकेट

पाकिस्तानला आठवा धक्का

हार्दिक पांड्याच्या चेंडूवर नवाज बाद झाला. भारताला आठवे यश

शादाब आला शादाब गेला

शादाब खान अवघ्या दोन धावांवर तंबूत परतला... बुमराहच्या चेंडूवर शादाब बाद झाला. पाकिस्तान सात बाद 171 धावा

बूम बूम बुमराह

मोहम्मद रिजवान 49 धावांवर बाद झाला. बुमराहने जबराट चेंडूवर केले त्रिफाळाचीत..... पाकिस्तानला सहावा धक्का

कुलदीपचा ड्रीम चेंडू

कुलदीपच्या जाळ्यात इफ्तिखार अहमद अडकलाय. इफ्तिखारला कुलदीपचा चेंडू समजलाच नाही. अवघ्या 4 धावांवर इफ्तिखार बाद झाला. 166 धावांवर पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत

कुलदीपच्या जाळ्यात शकील

कुलदीप यादवने शकील याला सहा धावांवर बाद केले. पाकिस्तानला चौथा धक्का बसलाय

सिराजने पाकिस्तानला दिला मोठा धक्का

बाबर आझम याला बाद करत सिराजने पाकिस्तानला दिला सर्वात मोठा धक्का.... अर्धशतकानंतर बाबर आझम बाद झाला आहे. पाकिस्तानला चौथा धक्का बसला आहे. 

बाबर आझमचे अर्धशतक

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने अर्धशतकी खेळी केली आहे. खणखणीत चौकार ठोकत बाबरने भारताविरोधातील सर्वोत्तम धावसंख्या केली आहे.

बाबर-रिजवानची जोडी जमली

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची जोडी जमली आहे. दोघांमध्ये अर्धशतकी भागिदारी झाली आहे.

पाकिस्तानचे शतक फलकावर

बाबर आझमच्या जबराट कव्हर ड्राईव्हनंतर पाकिस्तानचे शतक फलकावर

भारताला दुसरे यश

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर इमाम बाद झाला. भारताला दुसरे यश मिळाले आहे. इमाम 36 धावा काढून बाद झाला

इमामची जबराट फलंदाजी

अहमदाबादच्या मैदानावर इमाम उल हक याने दमदार फंलदाजीचे प्रदर्शन केले आहे. इमाम 36 धावांवर खेळत आहे.

पाकिस्तानला मोहम्मद सिराजकडून पहिला हादरा; अब्दुल्लाह शफिक तंबूत परतला

India vs Pakistan : पाकिस्तानला मोहम्मद सिराजकडून पहिला हादरा; अब्दुल्लाह शफिक तंबूत परतला


मोहम्मद सिराजने पाकिस्तानला पहिला हादरा दिला आहे. पाकिस्तानचा सलामीवीर अब्दुल्लाह शफिकला पायचित करत भारताला पहिले यश मिळवून दिले. 

सिराजचा पाकिस्तानला पहिला धक्का, शफीफ आऊट

सिराजचा पाकिस्तानला पहिला धक्का, शफीफ आऊट

पाकिस्तानला पहिला हादरा, सिराजने दिला दणका

India vs Pakistan : पाकिस्तानला पहिला हादरा, सिराजने दिला दणका


 


 

पाकिस्तानची प्लेईंग 11

बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद शकील, इमाम उल हक, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), सऊद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन अफ्रिदी, हारिस रौफ.

भारताची प्लेईंग 11 - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर

रोहित शर्माने नाणेफेक जिंकली

World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील महामुकाबल्याला सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअवर (Narendra Modi Stadium)  रोहित शर्माने नाणेफेक जिंकली.

थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारताचे पारडे जड

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमधल्या विश्वचषक सामन्यासाठी अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज झालंय. विश्वचषकाच्या रणांगणात भारत आणि पाकिस्तान संघांमधला सामना हा महामुकाबला मानला जातो. अवघ्या क्रिकेटविश्वात या सर्वाधिक उत्सुकता असलेला हा सामना असतो. या सामन्याला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरुवात होईल. विश्वचषकाच्या रणांगणावर आजवर भारत आणि पाकिस्तान संघांमध्ये सात सामने खेळवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्या सातपैकी सातही सामने भारतानं जिंकले आहेत. पण यंदाच्या विश्वचषकात भारताविरुद्धच्या अपयशाची मालिका खंडित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न राहिल. पाकिस्ताननं पहिल्या दोन सामन्यांमध्ये अनुक्रमे नेदरलँड्स आणि श्रीलंकेला हरवून विश्वचषकात आपली ताकद दाखवून दिली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तर पाकिस्ताननं ३४५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याची हिंमतही दाखवली. त्याचवेळी भारतानंही ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानला हरवून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतलीय. भारतापाठोपाठ पाकिस्तान गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.

रोहित शर्माला हटक्या शुभेच्छा

मोदी स्टेडिअमवर कल्ला

कलाकारांच्या परफॉर्मन्सला सुरुवात

भारतीय संघ अहमदाबाद स्टेडिअमवर दाखल

भारतीय संघ अहमदाबाद स्टेडिअमवर दाखल झाला आहे.

IND vs PAK LIVE Score : टीम इंडिया पाकिस्तानी भिडणार

अहमदाबाद : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज शनिवारी (14 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान (India Vs pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर(Narendra Modi Stadium) दुपारी 2 वाजता उभय संघांमधील हा सामना सुरू होईल. या ब्लॉकबस्टर सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर पाकिस्तान संघाची जबाबदारी बाबर आझमच्या खांद्यावर असेल. भारत आणि पाकिस्तानने आपापल्या पहिल्या दोन सामन्यात जोरदार विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत दोन्ही संघांचे खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत.

World Cup 2023 Points Table : भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्याआधी पॉईंट्स टेबलची स्थिती काय? वाचा सविस्तर

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आतापर्यंत 11 सामने खेळवण्यात आले आहेत. आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याआधी वर्ल्ड कपचा पॉईंट्स टेबल (World Cup 2023 Points Table) ची स्थिती जाणून घ्या.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

IND vs PAK LIVE Score : 'या' 5 भारतीय खेळाडूंकडून अहमदाबादमध्ये सर्वाधिक धावा

अहमदाबादच्या मैदानावर वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घ्या. या पाच खेळाडूंपैकी तीन खेळाडू निवृत्त झाले असून दोन खेळाडू आज होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यात मैदानात उतरणार आहेत. 


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

India Vs pakistan : कोहलीची 'विराट' ताकद मैदानात; जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रथी महारथी जमण्यास सुरुवात

अहमदाबाद : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये आज शनिवारी (14 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान (India Vs pakistan) यांच्यात महामुकाबला होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर(Narendra Modi Stadium) दुपारी 2 वाजता उभय संघांमधील हा सामना सुरू होईल. या ब्लॉकबस्टर सामन्यात रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करेल, तर पाकिस्तान संघाची जबाबदारी बाबर आझमच्या खांद्यावर असेल. भारत आणि पाकिस्तानने आपापल्या पहिल्या दोन सामन्यात जोरदार विजय मिळवला होता. अशा परिस्थितीत दोन्ही संघांचे खेळाडू आत्मविश्वासाने भरलेले आहेत.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs PAK LIVE Score : विश्वचषक 2023 मध्ये दोन्ही संघाने आतापर्यंत दोन-दोन सामने जिंकले

ODI World Cup 2023 India vs Pakistan : विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धीमध्ये सामना होणार आहे. अहमदाबादच्या रणगणांत या दोन संघामध्ये काटें की टक्कर होईल. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी मैदानात छोटेखानी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे, कारण दोन्ही संघाने आतापर्यंत दोन-दोन सामने जिंकले आहेत. पण शनिवारी होणाऱ्या सामन्याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा खिळल्या आहेत. शनिवारी कोणता संघ सलग तिसऱ्या विजयाची नोंद करतो, हेही पाहणं औत्सुक्याचे आहे.

IND vs PAK LIVE Score : पाकिस्तान विरोधात भारताची प्लेईंग 11 कशी असेल?

सलामी फलंदाज शुभमन गिल याच्या कमबॅककडे सर्वांच्या नजरा असतील. सामन्याच्या पूर्वसंध्येला शुभमन गिल 99 टक्के खेळण्यास तयार असल्याचे रोहित शर्माने सांगितले होते. शुभमन गिल संघात परतल्यास ईशान किशन याला बेंचवर बसावे लागेल. डेंग्यूने बेजार झालेला शुभमन गिल पहिल्या दोन सामन्यांना मुकला आहे. पण आता पाकिस्तानविरोधात कमबॅक करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय शार्दूल ठाकूर की अश्विनी की शामी हे नाणेफेकीनंतरच स्पष्ट होईल. दुसरीकडे, पाकिस्तानच्या संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. श्रीलंकाविरोधात खेळलेले 11 शिलेदार भारताविरोधात मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे. 

IND vs PAK, World Cup 2023 Exclusive : टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी मास्टर ब्लास्टर अहमदाबादेत, कोण जिंकणार सचिननं थेटच सांगितलं

Sachin Tendulkar to Support Team India : आज अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला पाहायला मिळणार आहे. या सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. सचिन तेंडुलकरने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्या आधी 'एबीपी माझा'ला मराठमोळी प्रतिक्रिया ही दिली आहे.


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

IND vs Pak : भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर अहमदाबादच्या दिशेने

IND vs Pak : भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर अहमदाबादच्या दिशेने रवाना, रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी


सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

IND vs PAK LIVE Score : भारत-पाकिस्तान आमने-सामने

सकाळी 10 वाजेपासून प्रेक्षकांना स्टेडिअममध्ये प्रवेश





IND vs PAK LIVE Score : भारत-पाकिस्तान सामन्याआधी संगीत कार्यक्रमाचं

ODI World Cup 2023 India vs Pakistan : विश्वचषकात आज भारत आणि पाकिस्तान या दोन संघात काटे की टक्कर होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यापूर्वी मैदानात छोटेखानी संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

IND vs PAK LIVE Score : विश्वचषकात भारतच भारी

वनडे इतिहासात पाकिस्तान संघाचे पारडे जड असले तरी विश्वचषकात भारतच वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये सातवेळा सामना झाला आहे. या  सर्व 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानला विश्वचषकातील एकही सामना जिंकता आला नाही.  2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करत भारत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर पाकिस्तान विश्वचषकातील पराभवाचा सिलसिला तोडण्यासाठी मैदानात उतरेल.

IND vs PAK LIVE Score : भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी कशी आहे ?

Narendra Modi Stadium Pitch Report :अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडू शकतो. फलंदाजांची येथे चांदीच होणार आहे. फलंदाजीला पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. गोलंदाजांनाही येथे थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. सामना पुढे जसा जाईल तशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जास्त आहे. मोठे मैदान असल्यामुळे गोलंदाज न घाबरता चेंडू टाकू शकतील. 

IND vs PAK LIVE Score : हवामान कसे असेल ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावेळी पावसाची शक्यता नाही. त्याशिवाय तापमानही सर्वसाधारण राहील.अहमदाबाद येथे शनिवारी जास्तीत जास्त 35 डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे. कमीत कमी 21 डिग्री इतके तापमान असू शकते. त्यामुळे शनिवारी अहमदाबादमध्ये जास्त ऊन्हाची शक्यता नाही.

IND vs PAK LIVE Score : वनडेत कोणत्या संघाचे पारडे जड

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 134 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने 73 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने 56 सामन्यात बाजी मारली आहे. म्हणजेच, आतापर्यंतच्या वनडे सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध 73 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. ही आकडेवारी पाहता एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं पारडे जड असल्याचे दिसतेय.  5 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

IND vs PAK LIVE Score : अहमदाबादच्या मैदानावर आतापर्यंत किती सामने ?

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आतापर्यंत 29 वनडे सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 13 वेळा विजयी झाला आहे. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 इतकी आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 206 आहे. 

IND vs PAK LIVE Score :  दुपारी 2 वाजता सामना

आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना दुपारी 2 वाजता नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवला जाणार आहे.

IND vs PAK LIVE Score : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार सामना

 IND vs PAK LIVE Score : आज भारत विरुद्ध पाकिस्तान बहुप्रतिक्षित सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

IND vs PAK LIVE Score : विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान टक्कर

विश्वचषक 2023 मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत.

पार्श्वभूमी

IND vs PAK WC 2023 LIVE Score Updates : भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK)  यांच्यामध्ये आज अहमदाबादच्या रणगंणात सामना होणार आहे. हे दोन्ही संघ कागदावर तुल्यबळ आहेत. पण भारतीय संघावर दडपण कमी असल्यामुळे पारडे जड आहे. आशिया चषकात भारताकडून पराभूत झाल्यामुळे आणि सुरुवातीच्या सामन्यात हवी तशी कामगिरी न केल्यामुळे पाकिस्तान संघावर त्यांच्या माध्यमांनी आणि माजी खेळाडूंनी टीका केली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर दडपणाचे मोठे ओझे आहे. त्यातच पाकिस्तान संघाच्या फलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या बाबर आझम याला पहिल्या दोन्ही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याच्यावरही दबाव आहे.  श्रीलंकेविरोधात पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली होती, पण अब्दुलाह शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी खेळी करत अशक्यप्राय विजय मिळवून दिला. शाहीन शाह आफ्रिदी यालाही अद्याप लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. हसन अली याने विकेट घेतल्या पण धावा रोखण्यात तो अपयशी ठरतोय.


भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात जबरदस्त विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सहज पराभव केला. कांगारुविरोधात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली तर अफगाणिस्तानविरोधात गोलंदाज आणि फलंदाजांनी टॉप कामगिरी केली आहे. याचाच अर्थ असा आहे, शनिवारी होणाऱ्या महामुकाबल्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे.  विराट कोहली आणि रोहित शर्मा, केएल राहुल भन्नाट फॉर्मात आहेत. विराट कोहलीने दोन्ही सामन्यात अर्धशतके ठोकली आहेत. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने वादळी शतक ठोकले होते. ऑस्ट्रेलियाविरोधात राहुलने नाबाद 97 धावांची खेळी केली होती. भारतीय संघाची फलंदाजी समतोल आणि मजबूत दिसत आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास मोहम्मद सिराजला अहमदाबादमध्ये आराम दिला जाऊ शकतो. दोन्ही सामन्यात सिराज महागडा ठरला होता. त्यामुळे शनिवारी मोहम्मद शामी खेळताना दिसू शकतो. शामीला अहमदाबादमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. बुमराहही लयीत आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा भन्नाट फॉर्मात आहे. आर. अश्विनलाही संधी मिळाल्यास तो सोनं करु शकतो. अहमदाबादचे मैदानात दिल्लीसारखे छोटे नाही, त्यामुळे अश्विनला खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे बलाबल कितीही चांगले असले तरीही भारतीय संघाचे पारडे जड आहे. 


वनडे विश्वचषकात भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव. 


वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ -


बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.