New zealand vs Pakistan T20 world Cup 2022: टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सेमीफायनल सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंडच्या संघानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-20 विश्वचषकाच्या फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. यापूर्वी दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनवर एक नजर टाकुयात.
न्यूझीलंडचा संघानं ग्रुप 1 मधील पाच पैकी तीन सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलचं तिकीट मिळवलं. या स्पर्धेतील न्यूझीलंडच्या संघानं एकच सामना गमावला तर, त्यांचा एक सामना अनिर्णित ठरला होता. दुसरीकडं पाकिस्तानच्या संघानंही ग्रुप 2 मधील तीन सामने जिंकले आहेत. परंतु, दोन सामन्यात पाकस्तानच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होतं.
दोन्ही संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल नाही
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात आज टी-20 विश्वचषकातील पहिला सेमीफायनल खेळला जातोय. दरम्यान, या सामन्यात न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही. दोन्ही संघ आपपल्या मागच्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहेत.
संघ-
न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.
पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.
टी-20 विश्वचषकातील नॉक आऊट सामने-
सामना | संघ | तारीख | वेळ |
पहिला सेमीफायनल | न्यूझीलंड vs पाकिस्तान | 09 नोव्हेंबर 2022 | दुपारी 1.30 |
दुसरा सेमीफायनल | भारत vs इंग्लंड | 10 नोव्हेंबर 2022 | दुपारी 1.30 |
फायनल | - | 13 नोव्हेंबर 2022 | दुपारी 1.30 |
हे देखील वाचा-