ICC Men's T20I Player Rankings: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादव त्याच्या बॅटनं धावांचा पाऊस पाडतोय. ज्याचा फायदा त्याला आयसीसीच्या टी-20 रॅंकींगमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय. आयसीसीच्या ताज्या टी-20 रँकींगमध्ये सूर्यकुमार यादव अव्वल स्थानी कायम आहे. याशिवाय, भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहनंही (Arshdeep Singh) आयसीसी टी-20 क्रमवारीत मोठी झेप घेतलीय. अर्शदीप सिंह 23व्या स्थानावर पोहचलाय.
ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवनं तर, अर्शदीप सिंहनं बॉलनं चमत्कार दाखवलाय. या स्पर्धेत अर्शदीप सिंहनं आतापर्यंत 10 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 14.10 तर, इकोनॉमी 7.83 इतकी आहे. आशिया चषकादरम्यान ट्रोल झालेल्या अर्शदीपनं टी-20 विश्वचषकात स्वत:ला सिद्ध करून दाखवलं.
ट्वीट-
सूर्यकुमारचा दमदार फॉर्म
सूर्यकुमार यादव सातत्यानं चांगली कामगिरी करताना दिसत आहे. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये सूर्यकुमार यादवनं आतापर्यंत पाच सामने खेळेल आहेत. ज्यात 75 च्या सरासरीनं 225 धावा केल्या आहेत. ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. या स्पर्धेत त्यानं 193 च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केलीय. टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, भारताचा स्टार फंलदाज विराट कोहीली 246 धावांसह टॉपवर आहे.
टॉप 3 गोलंदाज
दरम्यान, टी-20 गोलंदाजांच्या रँकींगमध्ये वानिंदु हसरंगा अव्वल स्थानी आहे. त्यानंतर अफगाणिस्तानचा राशीद खान दुसऱ्या तर, ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
टॉप 3 फलंदाज
आयसीसीच्या टी-20 रॅंकींगमध्ये सूर्यानंतर पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, न्यूझीलंडचा डेवॉन कॉन्वे तिसऱ्या क्रमांकावर आहे. यंदाच्या टी-20 विश्वचषकात मोहम्मद रिझवानची बॅट शांत दिसली. त्यानं पाच सामन्यात 20.60 च्या सरासरीनं 103 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-