T20 World Cup 2022, NZ vs ENG : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली असून आज न्यूझीलंड आणि पाकिस्तान (NZ vs PAK) यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर (Sydney Cricket Ground) पहिला सेमीफायनल सामना खेळला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या संघानं प्रथम फलंदाजीचा (New Zealand vs Pakistan) निर्णय घेतला. पण पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीसमोर  त्यांना केवळ 152 धावांपर्यंतच मजल मारता आली आहे. यावेळी कर्णधार केन विल्यमसन आणि डॅरिल मिशेल या दोघांनी एकहाती झुंज दिल्यामुळं धावसंख्या इथवर पोहोचली आहे. 






दोन्ही संघासाठी फायनल गाठण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या या सामन्यात प्रथम फलंदाजी न्यूझीलंडनं घेतली. एक मोठी धावसंख्या करुन पाकिस्तावर प्रेशर देण्याचा डाव त्यांचा होता. पण पाकिस्तानी गोलंदाजानी सुरुवातीपासून दमदार अशी गोलंदाजी केली. ज्यामुळे न्यूझीलंडनं सुरुवातीपासून विकेट गमावल्या. फिन अॅलन 4 तर कॉन्वे 21 धावा करुन बाद झाला. ग्लेन फिलिप्सही 6 धावांवर तंबूत परतला. ज्यानंतर मात्र केन आणि मिशेलनं डाव सावरला. केन 46 धावांवर बाद झाला तर मिशेलनं नाबाद 53 धावा केल्या. नीशमनंही नाबाद 16 धावाचं योगदान दिलं. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीनं 2 तर मोहम्मद नवाजनं एक विकेट घेतली.


कसे आहेत दोन्ही संघ?


न्यूझीलंडची प्लेईंग इलेव्हन:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.


पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन:
मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी.


दुसरी सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड


दरम्यान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे. तर उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगणार असून त्यांच्यात जिंकणारा संघ आजच्या विजयी संघासोबत 13 नोव्हेंबरला फायनल खेळेल.


हे देखील वाचा-