ICC Men's T20 World Cup : अवघ्या काही तासात ऑस्ट्रेलियातील टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. 16 संघामध्ये रनसंग्राम होणार आहे. 45 सामन्यानंतर टी 20 विश्वचषकाचा विजेता संघ कोण? यावरुन पडदा उठणार आहे. भारतासह यजमान ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंड संघाला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जात आहे. या विश्वचषकात अनेक नवीन विक्रम होतील काही जुने विक्रम मोडले जाणार आहेत. आतापर्यंतच्या टी 20 विश्वचषकात झालेल्या विक्रमावर एक नजर मारुयात...