Virat Kohli T20 World Cup Records : ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या रनसंग्रामाला अवघे काही दिवस उरले आहेत. विश्वचषकाच्या रनधुमाळीआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहचला आहे. भारतीय संघानं सराव सुरु केला आहे. विश्वचषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात होणार आहे. टी 20 विश्वचषकामध्ये भारतीय चाहत्यांसोबत जगातील क्रिकेट चाहतेही विराट कोहलीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. विराट कोहलीचं टी 20 मध्ये चांगला रेकॉर्ड आहे. विश्वचषकात विराट कोहलीनं धावांचा पाऊस पाडलाय.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. विराट कोहलीनं टी 20 क्रिकेटमध्ये नुकतेच शतक झळकावलं आहे. विराट कोहलीनं टी 20 विश्वचषकात धावांचा पाऊस पाडला आहे. विराट कोहलीनं विश्वचषकातील 19 डावात 10 अर्धशतकं झळकावली आहे. तसेच दोन विश्वचषकात विराट कोहली मालिकाविराचा मानकरी ठरला आहे.
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतक विराटच्या नावावर -
रनमशीन विराट कोहलीनं टी 20 विश्वचषकात दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहलीनं टी 20 विश्वचषकाच्या 21 सामन्यातील 19 डावांत 10 अर्धशतकं झळकावली आहे. 76.81 च्या दमदार सरासरीनं विराट कोहलीनं 845 धावांचा पाऊस पाडला आहे. टी 20 विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकं विराट कहलीच्या नावार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहित शर्माच्या नावावर 8 अर्धशतकं आहेत.
तब्बल दोन वर्षानंतर विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. आशिया चषकात विराट कोहलीनं शतकाचा दुष्काळ संपवला. अफगाणिस्तानविरोधात विराट कोहलीनं शतक झळकावलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरोधात दमदार फलंदाजीचं प्रदर्शन केले होतं. विराट कोहलीची सध्याची कामगिरी पाहाता चाहत्यांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहेत. कोहलीनं टी 20 विश्वचषकात विराट खेळी केल्यास 15 वर्षानंतर भारतीय संघ टी 20 विश्वचषक जिंकू शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषकातील सामने
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.