AUS vs IND, ICC Mens T20 World Cup Warm-up Matches: भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) आणि सूर्याकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) झुंजार अर्धशतकाच्या जोरावर भारतानं ऑस्ट्रेलियासमोर 187 धावांचं लक्ष्य ठेवलं. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) येथे सुरु असलेल्या सराव सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. दोन्ही संघानं टी-20 विश्वचषकाची तयारी कशी केलीय? हे या सामन्यातून स्पष्ट होईल. भारताच्या पहिल्या सराव सामन्यात कर्णधार रोहित शर्मानं (Rohit Sharma) मोहम्मद शामीला (Mohammed Shami) विश्रांती दिलीय. दरम्यान, वेगवान गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel), भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) भारताच्या गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतील.
ट्वीट-
केएल राहुल (57 धावा) आणि रोहित शर्मा (15 धावा) या सलामीच्या जोडीनं भारताला झंझावाती सुरुवात करून दिली. पहिल्या सहा षटकात भारतानं एकही विकेट न गमावता 70 धावा केल्या. यादरम्यान राहुलनं अवघ्या 27 चेंडूत अर्धशतक झळकावलं. तर, रोहितच्या बॅटीतून काही खास शॉट्स पाहायला मिळाले. या सामन्यातील पावरप्लेमध्ये भारताचं पारडं जड दिसलं. मात्र, पुढच्या चार षटकांत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पुनरागमन केलं. ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टन अगर यांनी अनुक्रमे केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना बाद करून भारताला दोन धक्के दिले. भारतानं 10 षटकात दोन विकेट्स गमावून 89 धावा केल्या. पुढच्या पाच षटकात भारतानं 49 धावा लुटल्या. परंतु, विराट कोहली (19 धावा) आणि हार्दिक पांड्याची (2 धावा) विकेट्स गमावली. अखेरच्या पाच षटकात भारतानं 48 धावा केल्या. अशाप्रकारे भारतीय संघानं निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. यादरम्यान सूर्यकुमार यादवनं 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाकडून केन रिचर्डसननं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, मिचेश स्टार्क, ग्लेन मॅक्सवेल आणि अॅस्टर अगरच्या खात्यात प्रत्येकी एक-एक विकेट्स जमा झाली.
संघ-
भारताची प्लेईंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह.
ऑस्ट्रेलियाची प्लेईंग इलेव्हन:
आरोन फिंच (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, जोश इंग्लिश, टीम डेव्हिड, अॅस्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, केन रिचर्डसन.
हे देखील वाचा-
- IPL 2023: रवींद्र जाडेजा चेन्नईच्या संघाची साथ सोडणार? आयपीएल 2023च्या ऑक्शनपूर्वी महत्वाची माहिती