T20 World Cup 2022 Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धा सुरु झाली असून आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. आजही दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना वेस्ट इंडीज विरुद्ध स्कॉटलंड (WI vs SCO) आणि दुसरा सामना झिम्बॉब्वे विरुद्ध आयर्लंड (ZIM vs IRE) यांच्यात खेळवला जाईल. पहिल्या दिवशी नामिबियाने श्रीलंका संघाला तर नेदरलँडने युएईला मात दिली. त्यानंतर आज पार पडणाऱ्या सामन्यांबद्दलची माहिती जाणून घेऊ...


कोणा-कोणाचे आहेत सामने?


आज दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना वेस्ट इंडीज विरुद्ध स्कॉटलंड आणि दुसरा सामना झिम्बॉब्वे विरुद्ध आयर्लंड असा रंगणार आहे.


कधी होणार सामने?


भारतीय वेळेनुसार दिवसातील पहिला सामना वेस्ट इंडीज विरुद्ध स्कॉटलंड सकाळी 9.30 वाजता तर दुसरा झिम्बॉब्वे विरुद्ध आयर्लंड सामना दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल.  


कुठे आहेत सामने?


आजचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाच्या होबार्ट येथील बेलेरिव्ह ओव्हल या क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.  


कुठे पाहता येणार सामना?


या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कसा होता विश्वचषकाचा पहिला दिवस?


आज दोन सामने पार पडणार असून पहिल्या दिवशी अर्थात 16 ऑक्टोबर रोजीही दोन सामने पार पडले. यावेळी पहिल्या सामन्यात अंडरडॉग समजल्या जाणाऱ्या नामिबिया संघाने श्रीलंका संघावर 55 धावांनी (SL vs NAM) विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत नामिबियाने164 धावांचे लक्ष्य श्रीलंकेला दिले. ज्यानंतर 164 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला खास कामिगरी करता आली नाही. कर्णधार दासुनने सर्वाधिक 29 धावा केल्या तर भानुका राजपक्षाने 20 धावा केल्या पण दोघांच्या बाद झाल्यानंतर पुढील फलंदाजांना डाव सावरता आला नाही आणि संपूर्ण संघ 108 धावांवर सर्वबाद झाला, ज्यामुळे नामिबियाने 55 धावांनी सामना जिंकला.  त्यानंतर दिवसातील दुसऱ्या सामन्यात नेदरलँडने युएईवर तीन विकेट्सनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना युएईने नेदरलँडला विजयासाठी 112 धावांचे लक्ष्य दिले. माफक लक्ष्य असतानाही नेदरलँडचा संघ हे पूर्ण करण्यासाठी बरीच धडपड करताना दिसला, पण अखेर दोन चेंडू शिल्लक असताना विजयी धाव घेत 7 विकेट्सने नेदरलँडने विजय मिळवला.


हे देखील वाचा-