Team India in T20 World Cup : टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) अखेर सुरु झाला असून पहिल्या दिवशी नामिबियाने श्रीलंकेला तर नेदरलँडने युएईला मात दिली. दरम्यान भारतीय संघाचा विचार करता भारत पहिला सामना 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं (ICC) या स्पर्धेत सहभागी सर्वच्या सर्व 16 संघाची संभाव्य प्लेईंग 11 कशी असू शकते, हे सागितलं आहे. यावेळी आयसीसीनं सांगितलेल्या भारताच्या प्लेईंग 11 मध्ये चक्क ऋषभ पंत आणि मोहम्मद शमी हे दोन्ही स्टार नसल्याचं दिसून आलं आहे. तर नेमकी आयसीसीनं सांगितलेली संभाव्य प्लेईंग 11 पाहूया...


आयसीसीने वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि डावखुरा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केलेला नाही. ऋषभ पंतच्या जागी दिनेश कार्तिकची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली आहे. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद शमी संघात सामील झाला असूनही त्याला संघात न घेता, हर्षल, अर्शदीप आणि भुवनेश्वर असा वेगवान गोलंदाजांचा ताफा ठेवला आहे. दुसरीकडे वरच्या फळीत अधिक बदल केले नसून सलामीला रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यांना ठेवलं आहे. तर अक्षर पटेल, युजवेंद्र चहलला फिरकीपटू म्हणून सामिल केलं आहे.


आयसीसीनं सांगितलेली संभाव्य अंतिम 11


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटले, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल.


विश्वचषक संघात बुमराहच्या जागी शमीची एन्ट्री


भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्वचषक अगदी तोंडावर असताना दुखापत झाली. त्यामुळे भारतात बुमराहच्या जागी कोण खेळणार? हा प्रश्न सर्वांसमोर होता. ज्यानंतर नुकतीच टीम इंडियाने अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बुमराहच्या जागी संघात एन्ट्री केली आहे. त्यामुळे आता बुमराहच्या जागी शमी आल्यानंतर T20 विश्वचषकासाठी भारताचे अंतिम 15 खेळाडूंची यादी समोर आली आहे.


असा आहे भारतीय संघ-


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह


राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर 


हे देखील वाचा- 


Team india Hotel : ऑस्ट्रेलिया क्रिकेटकडून मुद्दाम दुजाभाव? ऑस्ट्रेलियन संघाला 5 स्टार तर टीम इंडियासाठी 4 स्टार हॉटेल...