एक्स्प्लोर
न्यूझीलंडविरुद्धच्या विजयासोबत भारतीय महिला संघाचे 6 विक्रम
कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा उडवून महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाची लढत आता ऑस्ट्रेलिया महिला संघाशी होणार आहे.
कर्णधार मिताली राजच्या भारतीय संघाने न्यूझीलंडचा 186 धावांनी धुव्वा उडवून महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य सामन्यात भारतीय महिला संघाची लढत आता ऑस्ट्रेलिया महिला संघाशी होणार आहे.
या सामन्यात मिताली राज आणि राजेश्वरी गायकवाडने दमदार खेळी करुन न्यूझीलंडवर विजय मिळवून दिला. गोलंदाजी करताना राजेश्वरी गायकवाडने 5 विकेट घेत न्यूझीलंडचा अर्धा संघ एकटीने माघारी पाठवला.
याच सामन्यात भारतीय महिला संघाने विजयासोबतच 6 विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
- मिताली राज या सामन्यात सामनावीराची मानकरी ठरली. तिने आतापर्यंत पाच वेळा सामनावीराचा मान मिळवला आहे. महिला क्रिकेटमध्ये पाचव्यांदा सामनावीर होणारी मिताली पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर ठरली.
- महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामनावीराची मानकरी स्टेफनी टेलर ठरलेली आहे. तिच्या नावावर 19 सामनावीराचे पुरस्कार आहेत. या यादीत आता मिताली दुसऱ्या स्थानावर आहे.
- महिला विश्वचषकात भारतीय संघाचा मोठ्या धावसंख्येने होणारा हा पहिलाच विजय आहे. भारतीय संघाने आतापर्यंत एकाही संघाला 186 धावांपेक्षा जास्त अंतराने हरवलं नव्हतं.
- राजेश्वरी गायकवाडने या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावली. तिने 15 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या. यापूर्वी हा विक्रम एकटा बिष्टच्या नावावर होता. एकताने 18 धावा देऊन 5 विकेट घेतल्या होत्या.
- या सामन्यात भारताची सुपरफास्ट एक्स्प्रेस झूलन गोस्वामीने एक विकेट घेतली. यासोबतच भारतीय महिला क्रिकेटमध्ये 31 विकेट घेणारी ती पहिलीच गोलंदाज ठरली.
- या सामन्यात मिताली राज सर्वात जास्त वयात शतक ठोकणारी पहिलीच फलंदाज ठरली. तिने वयाच्या 34 व्या वर्षी शतक साजरं केलं, जे आतापर्यंत कुणीही केलेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
क्राईम
राजकारण
Advertisement