एक्स्प्लोर

Who is Sapna Gill : क्रिकेटपटू पृथ्वी शॉचा तरुणीसोबतचा व्हिडीओ व्हायरल; कोण आहे सपना गिल? वाचा संपूर्ण प्रकरण

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल कोण आहे जाणून घ्या.

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अलिकडे एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला. या व्हिडीओमध्ये पृथ्वी शॉ आणि एका तरुणीमध्ये वाद सुरु असल्याचं दिसून येत होतं. पृथ्वी शॉसोबत वाद घालणारी ही तरुणी अभिनेत्री सपना गिल (Sapna Gill) आहे. या व्हिडीओमध्ये पृथ्वी आणि एका तरुणीमध्ये बाचाबाची सुरु असल्याचं स्पष्ट दिसत होतं. पृथ्वीच्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेक चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान या प्रकरणात संबंधित तरुणी म्हणजे अभिनेत्री सपना गिल आणि आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case Update : पृथ्वी शॉ - सपना गिल सेल्फी प्रकरण

भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ टीम इंडियाच्या खेळातून सध्या बाहेर आहे. सध्या पृथ्वी अभिनेत्री सपना गिलसोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. मुंबईच्या रस्त्यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. सपना गिलने पृथ्वीच्या मित्राच्या गाडीच्या काचा फोडल्या असा आरोप आहे. त्यानंतर अभिनेत्री सपना गिलला पोलिसांनी अटक केली आहे. सपना गिल कोण आहे तिचं करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबाबत माहित नसलेल्या गोष्टी जाणून घ्या.

Who is Sapna Gill : कोण आहे सपना गिल?

सपना गिल भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. सपना तिचं ग्लॅमर आणि अभिनयाच्या जोरावर भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये हळूहळू आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहे. सपना गिल सध्या 26 वर्षांची आहे. सपनाचा जन्म पंजाबची राजधानी चंदीगड येथे झाला. सपनाने 'काशी अमरनाथ' आणि 'निरहुआ चलल लंदन' या चित्रपटांमध्ये भोजपुरी सुपरस्टार अभिनेता रवि किशन आणि दिनेश लाल यादव 'निरहुआ' यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या अद्याप एवढी प्रसिद्धी मिळाली नसली. तरी पृथ्वी शॉसोबतच्या वादामुळे सपना गिल चर्चेत आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sapna Gill (@sapnagillofficial)

पाहा व्हिडीओ : पृथ्वी शॉ आणि सपना गिल यांच्या व्हायरल व्हिडीओ

Prithvi Shaw Sapna Gill Selfie Case : काय आहे प्रकरण?

भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ याचा एका तरुणीसोबत वाद झाला. मुंबईतील हॉटेल बाहेर ही घटना घडली. सेल्फी घेण्यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर आलं. पृथ्वी शॉसोबत सेल्फी काढताना हाणामारी झाल्याचं यात सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना जोगेश्वरी लिंक रोड येथील लोटसच्या पेट्रोल पंपाजवळ घडल्याची माहिती आहे. पृथ्वी शॉच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ याचा एका हॉटेलात पार्टी सुरु असताना सेल्फी काढण्यावरुन वाद झाला. त्यानंतर हॉटेलमधून शॉ दुसऱ्या कारने घराकडे निघाला होता. त्यादरम्यान त्याच्या मित्राच्या कारमध्ये तो असल्याचं संबधितांना वाटलं आणि तरुणी आणि तिच्या मित्रांनी त्या कारवर हल्ला केला. त्यानंतर दुसरा व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये तरुणी आणि पृथ्वीमध्ये वाद सुरु होता. या प्रकरणावरुन पृथ्वीच्या मित्रांनी ओशिवरा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरुन संबंधित तरुणी आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणी सपना गिलसह इतर दोन आरोपी अटकेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून तपासामध्ये खरं काय ते समोर येईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Prithvi Shaw : पृथ्वी शॉ सेल्फी वाद प्रकरण, आणखी दोन फरार आरोपी अटकेत; काय आहे प्रकरणा?

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg T20 Series Schedule: श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
श्रीलंकेनंतर भारत आणि अफगाणिस्तानमध्ये रंगणार टी-20 मालिका; संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कुठे, कधी, किती वाजता होणार समाने?
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget