एक्स्प्लोर

पदार्पणाच्या सामन्यातच आठ विकेट घेणारा गोलंदाज भारतीय संघात

दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी इंग्लंडमध्येच भारतीय अ संघाकडून खेळत असलेल्या दीपक चहरला संधी देण्यात आली आहे.

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेअगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याच्या जागी इंग्लंडमध्येच भारतीय अ संघाकडून खेळत असलेल्या दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना आपल्या स्विंगमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या या गोलंदाजाला बुमराच्या जागी संधी देण्यात आली. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि सिद्धार्थ कौल या गोलंदाजांसोबत तो आता खेळणार आहे. रणजीच्या पदार्पणातच धमाका 2010 साली रणजी क्रिकेटमध्ये राजस्थानचा सामना हैदराबादसोबत होता आणि संघातून 18 वर्षीय दीपक चहर पदार्पण करत होता. त्याने या सामन्यात आपल्या स्विंगची कमाल दाखवत दहा धावा देत आठ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. या गोलंदाजीमुळे हैदराबादचा डाव केवळ 21 धावांवर आटोपला. संपूर्ण मोसमात त्याने 30 विकेट घेतल्या, ज्यामुळे राजस्थानला दुसऱ्यांदा रणजी चॅम्पियन होता आलं. दीपक चहरच्या यशामागे भारताच्या माजी प्रशिक्षकांचं वक्तव्य आहे, ज्यात ते म्हणाले होते, की दीपक चहर कोणत्याही संघाकडून खेळण्याच्या लायकीचा नाही. मात्र आपली जिद्द आणि मेहनतीच्या बळावर दीपक चहरने भारतीय संघात जागा मिळवण्यापर्यंत मजल मारली. ग्रेग चॅपल यांचं वक्तव्य, चहरचं यश राजस्थान क्रिकेट संघाचे संचालक म्हणून ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपल यांची नियुक्ती करण्यात आली होती. रणजी संघात जागा मिळवण्यासाठी चहर ट्रायलला आला. मात्र तू रणजी सोड, क्लब क्रिकेटमध्ये खेळण्याच्या लायकीचाही नाही, असं म्हणत त्यांनी 16 वर्षीय चहरला बाहेरचा रस्ता दाखवला. त्याच वेळी त्याने निश्चय केला आणि आज भारतीय संघात जागा मिळवली आहे. धोनीच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक क्रिकेटर घडला दीपक चहरच्या या प्रवासात टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाचाही तेवढाच वाटा आहे. मनप्रीत गोनीपासून ते आर. अश्विनपर्यंत कित्येक खेळाडूंना धोनीच्या नेतृत्त्वात खेळण्याची संधी मिळाली. आता दीपक चहरचाही त्याच यादीत समावेश झाला आहे. आयपीएलमध्ये खेळताना धोनीच्या नेतृत्त्वात दीपक चहर चेन्नई सुपरकिंगज्चा महत्त्वाचा गोलंदाज होता. त्याने आपल्या स्विंगने सर्वांचंच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं, ज्याच्या बळावर त्याला संघात स्थान देण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Deepak Chahar bat got stolen: भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
भारतीय क्रिकेटपटूच्या तीन महागड्या बॅट मैदानातून चोरीला गेल्या, म्हणाला, मी आता थेट मोदी किंवा योगींना....
Asian Games 2026 : पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
पीटी उषाचा 42 वर्षांचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला; विथ्या रामराजचा आशियाई स्पर्धेत धडाकेबाज पराक्रम, गुलवीर सिंगलाही रौप्यपदक
Rohit Sharma : रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला, विराट कोहली काळजीनं पाहात राहिला, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
रोहित शर्मा बसमधून उतरताना पायऱ्यांवरुन पाय घसरुन पडला,नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ
Vinod Kambli Video Viral : विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं
विनोद कांबळींना वृद्धाश्रमात का ठेवलं? हॉस्पिटलकडून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर कांबळींच्या पत्नीची नाराजी! कारणही सांगितलं

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neelam Gorhes Pune Bungalow : घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
घरात घुसण्याचा प्रयत्न; नीलम गोऱ्हेंने सांगितलं काय केलं नुकसान? तरूणाची आई म्हणाली, 'चोर नाही, तो थोडा मेंटली डिस्टर्ब...'
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Video: नेपाळवर अस्मानी संकट सुटता सुटेना, आता महाकाय डोंगर नदीत कोसळला, रस्त्यावर ढिगाऱ्यांवर ढिगारे, परिसरातील पूर आणि भूस्खलनामुळे 14 जणांचा मृत्यू; नदीत क्रूझ सुद्धा पलटी
Sanjay Raut: ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावरची लढाई, राज आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद आहे का? संजय राऊतांनी अवघ्या सहा शब्दात सांगितलं अन् भूवया उंचावल्या!
Sudhir Raut : अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासात सोबत; अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत ते शब्द उच्चारले अन् पुढच्या तासाभरात विमान पडलं, सुधीर राऊतांनी सांगितली दादांसोबतची शेवटची भेट
Election Commission: इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
इकडं ठाकरे बंधू आज विराट मोर्चासाठी रणशिंग फुंकणार, तिकडं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून पहिला मोठा निर्णय! थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे चार मागण्या
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
मनोज जरांगेंना एकापाठोपाठ एक झटके, महिलेकडून पोलिसांत तक्रार, थेट शिंदे-फडणवीसांकडेच मदत मागितली
Matang Morcha: मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार, पोलिसांनी काही कळायच्या आत सीएसएमटी परिसर पिवळ्या जनसागराने व्यापला, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
Chanakya Niti: आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
आयुष्यात कोणत्या प्रसंगी गप्प राहावे? मौनपणा कधी शहाणपणाचा ठरतो? चाणक्यनीती सांगते...
Embed widget