एक्स्प्लोर

क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लोढा समितीच्या 10 शिफारसी

मुंबई : सुप्रीम कोर्टाने भारतीय क्रिकेट बोर्डाबाबत दिलेला निर्णय हा क्रिकेटचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया न्यायमूर्ती लोढा यांनी दिली. लोढा समितीच्या शिफारशींमुळेच बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची विकेट पडली. त्यांना अध्यक्षपदावरून तर अजय शिर्के यांना सचिवपदावरुन हटवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. भारतीय क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाने कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. 2013 मध्ये आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगची प्रकरणं समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. याप्रकरणाच्या तपासासाठी तयार करण्यात आलेल्या मुदगल समितीने ऑगस्ट 2014 मध्ये सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सादर केला.

BCCI अध्यक्ष अनुराग ठाकूरांची विकेट, अध्यक्षपदावरुन आऊट!

जानेवारी 2015 मध्ये बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणि बदल घडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने माजी मुख्य न्यायाधीश आर एम लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली. लोढा समितीने जानेवारी 2016 मध्ये सुप्रीम कोर्टाला आपला 159 पानांचा अहवाल सादर केला. यामध्ये लोढा समितीने 10 शिफारसी केल्या आहेत. काय आहेत लोढा समितीच्या शिफारसी?
  • एका राज्यामध्ये एकच संघटना असावी, ज्यामध्ये सर्व सदस्यांच्या समावेश असावा. शिवाय रेल्वे, विद्यापीठं यांनाही या संघटनेचं सदस्यत्व मिळावं, अशी महत्वाची शिफारस लोढा समितीने केली आहे.
(एक राज्य एक मत, या शिफारशीली मुंबई क्रिकेट असोसिएशनचा विरोध आहे. कारण महाराष्ट्रात विदर्भ, मुंबई आणि महराष्ट्र क्रिकेट असोसिएशन्स आहेत. त्यामुळे एक राज्य एक मतला विरोध आहे)
  • आयपीएल आणि बीसीसीआयची कार्यकारिणी वेगवेगळी असावी. आयपीएलसाठी वेगळ्या स्वायत्त कार्यकारिणी असावी.
 
  • बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी काही निकष लावणं गरजेचं आहे. पदाधिकारी बनण्यासाठी संबंधित व्यक्ती मंत्री किंवा सरकारी अधिकारी नसावा. त्याने बीसीसीआयमध्ये 9 वर्षे किंवा तीन टर्म कार्यकाळ केलेला नसावा. बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला सलग दोन वेळा किंवा त्यापेक्षा अधिकचा कार्यकाळ मिळू नये.
 
  • लोढा समितीने आयपीएलचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुंदर रमण यांना क्लीन चिट दिली आहे. 2013 मध्ये आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगचं प्रकरण समोर आलं त्यावेळी आयपीएलचं आयोजन रमण यांच्या हातात होतं. त्यांनी नोव्हेंबर 2015 मध्ये राजीनामा दिला होता.
 
  • सट्टेबाजी ही कायदेशीर केली पाहिजे, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असावी.
 
  • खेळाडूंचीही एक स्वतंत्र संघटना असावी.
 
  • एक संचालकीय समिती बनवावी, ज्यामध्ये माजी गृह सचिव जी के पिल्लई अध्यक्ष असतील, तर मोहिंदर अमरनाथ, डायना ईदुलजी आणि अनिल कुंबळे हे या समितीचे सदस्य असतील.
 
  • बीसीसीआयच्या हितांच्या निर्णयांसंबंधी एक आचारसंहिता अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
 
  • बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणावं.
 
  • क्रिकेट संबंधीत प्रकरणं निकाली काढण्याची जबाबदारी माजी खेळाडूंवर दिली पाहिजे. तर इतर प्रकरणांसाठी सीईओ, त्यांचे सहा व्यवस्थापक आणि दोन समित्यांची व्यवस्था असावी, अशी शिफारस आपल्या अहवालात लोढा समितीने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

BCCI Chief Selector : बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
बीसीसीआयला बसला मोठा धक्का! ज्या खुर्चीसाठी रांग लागते, तीच ऑफर 100 कसोटी खेळलेल्या दिग्गजांनी लाथाडली; क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ
IND vs WI 4th T20 : अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
अर्शदीपच्या जिवावर उठला होता वेस्ट इंडिजचा गोलंदाज?, टीम इंडियाच्या शेवटच्या षटकात हाय-व्होल्टेज ड्रामा, श्रेयसने थेट डावच केला घोषित, नेमकं काय घडलं?
Ind Squad For NZ Test : 8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
8 महिन्यांत, 3 वेळा दुखापत; तरीही गंभीरच्या लाडक्याची वनडेत होणार सरप्राईज कमबॅक?, KKRच्या 'या' वाघावर BCCI एवढी मेहेरबान कशासाठी?
IND vs WI 4th T20 : वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं
वैभवचा आत्मविश्वास पूर्णपणे खच्ची केला; संजूसोबत त्याला सलामीला पाठवा, माजी क्रिकेटपटू संतापले, टीम इंडियाच्या मॅनेजमेंटला सुनावलं

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget