एक्स्प्लोर

WIvsIND 2nd Test, Day-3 : विंडीजविरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 8 विकेट्सची गरज

अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांची अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांच्या भागीदारीमुळे 168 धावांवर भारताने आपला डाव घोषित केला. परिणामी विंडीजसमोर 469 धावांचं विराट लक्ष्य ठेवलं.

जमैका : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात जमैकामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने यजमानांसमोर विजयासाठी 469 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रत्युत्तरादाखल तिसऱ्या दिवसअखेरीस विंडीजने 2 विकेट्सच्या मोबदल्यात 45 धावा केल्या केला. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातील विंडीजनेच केली होती. भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 117 धावांत गुंडाळला. त्यामुळे या कसोटीत टीम इंडियाला तब्बल 299 धावांची आघाडी मिळाली. पण त्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने विंडीजला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र भारतीय संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली आणि एकामागोमाग चार विकेट्स पडल्या. मात्र अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांची अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाचा डाव सावरला. दोघांच्या भागीदारीमुळे 168 धावांवर भारताने आपला डाव घोषित केला. परिणामी विंडीजसमोर 469 धावांचं विराट लक्ष्य ठेवलं. यावेळी मोहम्मद शमी आणि ईशांत शर्मा यांनी भारताला दोन विकेट्स मिळवून दिल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विंडीजच्या 2 बाद 45 धावा झाल्या होत्या. ब्राव्हो 18 आणि ब्रुक्स 4 धावांवर नाबाद होते. हनुमा विहारीचं पहिलं शतक भारताच्या हनुमा विहारीने जमैका कसोटीत आपल्या कारकीर्दीतलं पहिलं शतक झळकावलं. त्यामुळे भारताला पहिल्या डावात सर्व बाद 416 धावांची मजल मारता आली. अँटिगाच्या पहिल्या कसोटीत हनुमा विहारीचं शतक सात धावांनी हुकलं होतं. पण जमैकाच्या दुसऱ्या कसोटीत त्याने 225 चेंडूंत 16 चौकारांसह 111 धावांची खेळी उभारली. त्याने ईशांत शर्माच्या साथीने आठव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. त्यात ईशांतचा वाटा 57 धावांचा होता. बुमराची हॅटट्रिक जसप्रीत बुमरा हा कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा भारताचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी भारताच्या हरभजनसिंह आणि इरफान पठाण यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेण्याचा पराक्रम गाजवला होता. जमैका कसोटीत बुमराने डॅरेन ब्राव्हो, शामर ब्रूक्स आणि रॉस्टन चेस या तिघांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर माघारी धाडून हॅटट्रिक साजरी केली. वास्तविक पंचांनी रॉस्टन चेसला नाबाद ठरवलं होतं. पण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केलेलं डीआरएस अपील, पंचांनी उचलून धरलं. त्यामुळे बुमराने आपल्या हॅटट्रिकचं श्रेय विराटला दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये टी 20  नंतर वनडे मालिका गमावली,  तीन खेळाडूंसाठी टीमची दारं बंद?
भारताची पराभवाची मालिका थांबेना, इंग्लंडमध्ये वनडे मालिकेत पराभव, तीन खेळाडूंसाठी भारताची दारं बंद
Rohit Sharma Ind Vs Eng ODI: मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
मुंबईचा राजा रोहित शर्माने सिलेक्टर्सच्या नाकावर टिच्चून शतक ठोकलं, वय झालं म्हणणाऱ्यांना तोंडघशी पाडलं
Ferran Torres Story: वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
वयाच्या सहाव्या वर्षी आजोबांच्या तालमीत प्रशिक्षण; घरच्या कुत्र्याला गोलकीपर बनवत सराव; विश्वचषकात स्पेनला विश्वचषक मिळवून देणारा फेरान टोरेस कोण?
Shubman Gill: लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...
लॉर्ड्सवर टीम इंडियाचा पराभव, मालिकाही गमावली; कर्णधार शुभमन गिलने कोणाला ठरवले जबाबदार? रोहित-विराटबाबत म्हणाला...

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Jantar Mantar Delhi CJP Protest: दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
दिल्ली पोलिसांनी मागचापुढचा विचार न करता सपासप काठ्या चालवल्या, घाव वर्मी बसल्याने तरुणी गंभीर जखमी, मृत्यूशी झुंज
Jantar Mantar Lathi Charge: आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
आपण आता हुकूमशाहीविरोधात लढलो नाहीतर पुढची पिढी आपल्याला षंढ म्हणेल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे: संदीप देशपांडे
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Embed widget