एक्स्प्लोर

सचिनने उलगडलं विराटच्या यशाचं रहस्य!

मुंबई : आयपीएलच्या मैदानात यंदा फक्त विराट कोहलीचाच बोलबोला आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते वासिम अक्रमपर्यंत सगळे दिग्गज विराटच्या खेळाचं कौतुक करताना थकत नाहीत.   15 सामन्यांत 919 धावा, 83.54 अशी जबरदस्त सरासरी, चार शतकं, सहा अर्धशतकं. कोहलीच्या याच विराट कामगिरीने रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरला आयपीएलच्या फायनलपर्यंत नेलं आहे.   काय आहे विराटच्या या यशाचं रहस्य? मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या मते, विराट कधीहरी तंत्राशी तडजोड करत नाही, म्हणून तो इथवर पोहोचला आहे.   गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सचिनने म्हटलं आहे की, "विराट नेहमी सरळ बॅटने खेळतो. त्याच्या भात्यात चांगले फटके आहेत. त्याची गुणवत्ता खास आहेच आणि तो खेळावर मेहनतही घेतो. विराटची शिस्त आणि संघाविषयी त्याची बांधिलकी इतरांनीही शिकण्यासारखी आहे. तो खेळाच्या वेगवेगळ्या फॉरमॅटमध्येही तंत्राला मुरड घालत नाही. विराट मानसिकदृष्ट्या कणखर आहे आणि दबावाखाली तो आणखी बहरतो."   सचिनच्या बोलण्यात किती तथ्य आहे, ते विराटची आकडेवारीच सांगते. विराटने यंदाच्या मोसमातील 15 सामन्यांमध्ये 78 चौकार आणि 36 षटकार ठोकले आहेत. त्याने एकूण 528 धावा या चौकार-षटकारांमध्ये जमा केल्या आहेत. म्हणजेच विराटने तब्बल 391 धावा या धावून काढल्या आहेत. टक्केवारीचा विचार केला तर विराटने 42.54 टक्के धावा या धावून काढल्या आहेत. त्याही ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये आयपीएलसारख्या स्पर्धेत.   विराटची धावांची भूक तर मोठी आहेच, शिवाय त्याने खेळात सातत्यही राखलं आहे. तो सहजासहजी आपली विकेट फेकत नाही. त्यामुळे विराटला गोलंदाजी करताना मीही चिंतेत पडलो असतो, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचा महान वेगवान गोलंदाज वसिम अक्रमने दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
Vaibhav Sooryavanshi : अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
अवघ्या 15 वर्षांच्या वैभवने डोक लावलं, ईशान किशनने DRS घेतला आणि विकेट मिळाली; सगळे हैराण, पाहा VIDEO
ENG vs PAK 3rd Test : नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला
नाचता येईना, अंगण वाकडं... भारताचं नाव घेत पाकिस्तानी दिग्गजाचा खळबळजनक दावा, इंग्लंड टीमला नको नको ते बोलला
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरची लोणावळ्यात कोट्यवधींची खरेदी; एकाचवेळी 3 आलिशान प्रॉपर्टीची खरेदी
सचिन तेंडुलकरची लोणावळ्यात कोट्यवधींची खरेदी; एकाचवेळी 3 आलिशान प्रॉपर्टीची खरेदी

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवलं; अभिजीत दिपके, हर्षवर्धन सपकाळांचा संताप
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Embed widget