एक्स्प्लोर
Advertisement
विराट कोहलीकडून युवराज सिंहचा 12 वर्षापूर्वींचा विक्रम मोडीत
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर काल (11 डिसेंबर) खेळवण्यात आलेल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराटने अवघ्या 29 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या सहाय्याने 70 धावा झोडपल्या. यासोबत दोन नवे विक्रम रचले.
मुंबई : विराट कोहलीच्या टीम इंडियाने वानखेडेच्या निर्णायक टी-20 सामन्यात विंडीजचा 67 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह टीम इंडियाने तीन टी-20 सामन्यांची ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर विंडीजसमोर 241 धावांचं मोठं आव्हान उभं केलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला आठ बाद 173 धावांचीच मजल मारता आली.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने काल पुन्हा एकदा विरोधी संघाची तुफान धुलाई केली. विराटने अवघ्या 29 चेंडूत चार चौकार आणि 7 षटकारांसह 70 धावा चोपल्या. या तुफानी खेळीमुळे विराटने भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह याचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
विराट हा कोणत्याही एका टी-20 मालिकेत सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने भारत आणि वेस्ट इंडिजमधील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत एकूण 13 षटकार ठोकले. युवराज सिंहने 2007 च्या टी-20 विश्वचषकात पाच डावात 12 षटकार लगावले होते. युवराजचा हाच विक्रम विराटने मोडीत काढला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात विराट कोहलीने 50 चेंडूत नाबाद 94 धावांची खेळी केली होती. या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या टी-20 सामन्यात विराटला एकही षटकार लगावता आला नाही. तर तिसऱ्या टी-20 सामन्यात विराटने 7 षटकार लगावले. दोन्ही सामन्यांमध्ये मिळून विराटने एकूण 13 षटकार लगावले.
दरम्यान, कालच्या सामन्यात विराटने सात धावा पूर्ण करताच अजून एक विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. विराट कोहली हा मायदेशात खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात एक हजार धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. याआधी न्यूझीलंडच्या मार्टीन गुप्टील आणि कोलिन मन्रो या दोघांनी हा टप्पा ओलांडला आहे.
वाचा : 'हिटमॅन' रोहित शर्माची तुफान फटकेबाजी, रचले नवे विक्रम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement