एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कसोटी क्रिकेटमध्ये जलद 6 हजार धावा, विराट दुसरा भारतीय
कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा विराट हा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा पार केला. विराटने इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या साऊदम्प्टन कसोटीत अँडरसनच्या गोलंदाजीवर चौकार ठोकत सहा हजार कसोटी धावा पूर्ण केल्या.
या कामगिरीसह विराट कसोटी क्रिकेटमध्ये सहा हजार धावा करणारा भारताचा दहावा फलंदाज ठरला आहे. तर सर्वात जलद सहा हजार धावा करणारा सुनील गावस्कर यांच्यानंतरचा दुसरा भारतीय ठरला.
गावस्कर यांनी 117 डावांत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. विराटने 70 कसोटी सामन्यांतल्या 119 डावांत ही कामगिरी करुन दाखवली.
कसोटी क्रिकेटमध्ये जलद सहा हजार धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज :
सुनील गावस्कर – 117 डाव
विराट कोहली – 119 डाव
सचिन तेंडुलकर – 120 डाव
वीरेंद्र सेहवाग – 123 डाव
राहुल द्रविड – 125 डाव
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement