एक्स्प्लोर

विराट... 2016 गाजवणारा क्रिकेट विश्वातील धुव्र तारा!

मुंबई: 2017 या नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे आणि तुम्हा आम्हा सर्वांप्रमाणेच भारतीय खेळाडू नवी आव्हानं स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या वर्षी सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या पाच भारतीय खेळाडूंकडून तर भारतीय चाहत्यांना यंदा आणखी मोठ्य़ा कामगिरीची अपेक्षा आहे. त्यात पहिला नंबर आहे विराट कोहलीचा. कोहलीच्या नेतृत्त्वाखालीच टीम इंडियानं गेल्या वर्षी कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थान गाठलं आणि वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टीतही मोठं यश मिळवलं. 2016 साली विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा असा ओघ वर्षभर सुरू राहिला. टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारानं कसोटी, वन डे आणि ट्वेन्टी20 या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये मिळून तब्बल 2,595 धावांचा रतीब घातला. कोहलीनं 2016 साली 12 कसोटी सामन्यांत 75.93 अशा भक्कम सरासरीनं 1,215 धावा ठोकल्या. त्याची सर्वोत्तम खेळी होती 235 धावांची. विराटनं यादरम्यान दोन अर्धशतकं आणि चार शतकं ठोकली. त्यात तीन द्विशतकांचा समावेश होता. विशेष म्हणजे विराटनं सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतकं साजरी केली. 22 जुलै 2016, अँटिगा कसोटीत वेस्ट इंडीजविरुद्ध 200 धावांची खेळी. 9 ऑक्टोबर 2016, इंदूर कसोटीत न्यूझीलंडविरुद्ध 211 धावा. 11 डिसेंबर 2016, मुंबई कसोटीत इंग्लंडविरुद्ध 235 धावा. विराटनं धावांचे असे डोंगर रचलेच, पण एक कर्णधार म्हणून आपल्या टीमला विजयाचा मंत्रही दिला. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थान परत मिळवलं. पण भारत सलग अठरा कसोटींमध्ये अपराजित राहिला आहे. 2016 या वर्षात भारतानं कसोटीत वेस्ट इंडीजला 2-0 असं, न्यूझीलंडला 3-0 असं आणि इंग्लंडला 4-0 असं हरवण्याचा पराक्रम गाजवला. त्यात कोहलीचं योगदान विसरता येणार नाही. विराटनं 2016 साली वन डे क्रिकेटवरही आपला ठसा उमटवला. त्यानं 10 वन डे सामन्यांत 92.37च्या सरासरीनं 729 धावा फटकावल्या. विराटनं या वर्षी वन डेत तीन शतकं आणि चार अर्धशतकं साजरी केली. त्याची सर्वोत्तम खेळी होती नाबाद 154 धावांची. ट्वेन्टी20च्या मैदानात तर विराटची बॅट आणखीनच तळपली. विराटनं 2016 साली 15 ट्वेन्टी-20 सामन्यांत 106.83च्या सरासरीनं 641 धावा कुटल्या. त्यानं यादरम्यान सात अर्धशतकं ठोकली. विराटची सर्वोत्तम खेळी होती नाबाद 90 धावांची. ट्वेन्टी20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध विराटची 55 धावांच्या खेळीनं भारतीय विजयाचा पाया घातला. याच स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध साखळी सामन्यात विराटच्या 82 धावांच्या खेळीनं भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं. विराट केवळ आक्रमक फलंदाज नाही, तर संघाच्या गरजेनुसार मोठी खेळी करण्याची क्षमता त्याच्याकडे असल्याचं याच खेळीनं दाखवून दिलं. विराटनं हाच फॉर्म आयपीएलमध्येही कायम राखला आणि रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरकडून चार शतकं ठोकली. आयपीएल 2016 मध्ये विराटनं 16 सामन्यांत 81.8च्या सरासरीनं 973 धावा ठोकल्या. त्यात चार शतकांसोबतच सात अर्धशतकांचाही समावेश होता. (81.8 सरासरी) विराटनं एकहाती खिंड लढवून आपल्या टीमला आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलं. कोहलीची धावांची भूक 2016 साली आणखीनंच वाढलेली दिसली. ती अजूनही शमलेली नाही. नव्या वर्षातही विराटनं धावांचे डोंगर रचत राहावं अशीच त्याच्या चाहत्यांची अपेक्षा आहे

महत्त्वाच्या बातम्या

Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026 : स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्... नेमकं काय घडलं?
स्मृती मानधना निघून गेली, मोहसीन नक्वी घाईघाईने पळत बाहेर गेला, पण स्टेडियमबाहेर पाकिस्तानी फॅनने गाडी अडवली अन्... नेमकं काय घडलं?
BCCI on Mohsin Naqvi : स्टेजवर मोहसीन नक्वी दिसले, टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार; आशिया कप वादावर BCCIची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चात्ताप...
स्टेजवर मोहसीन नक्वी दिसले, टीम इंडियाचा ट्रॉफी घेण्यास नकार; आशिया कप वादावर BCCIची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चात्ताप...
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026 : ट्रॉफी चोर मोहसीन नक्वी स्टेजवर एकटाच, चॅम्पियन टीम इंडिया घोळका करून उभी राहिली अन्..., दुबईत मध्यरात्री नेमकं काय घडलं?, VIDEO
ट्रॉफी चोर मोहसीन नक्वी स्टेजवर एकटाच, चॅम्पियन टीम इंडिया घोळका करून उभी राहिली अन्..., दुबईत मध्यरात्री नेमकं काय घडलं?, VIDEO
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा

व्हिडीओ

Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा
Shweta Mahale Vs Sanjay Gaikwad : श्वेता महालेंवरील वक्तव्य भोवलं, संजय गायकवाड यांच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
मोहसीन नक्वीला स्टेजवर पाहताच स्मृती मानधना माघारी फिरली, टीम इंडियाचा ट्रॉफी घ्यायला नकार, दुबईच्या मैदानात हायव्होल्टेज ड्रामा
MH-CET Exam : सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
सीईटी डेटा लीक अन् सेंटर मॅनेजमेंट प्रकरणाची होणार चौकशी, मुख्यमंत्री फडणवीसांचे FIR आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश
Mohsin Naqvi Team India Asia Cup 2026: टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
टीम इंडियाच्या मुलींकडून सर्वांदेखत पाणउतारा, मोहसीन नक्वी अवाक होऊन पाहतच राहिला
BJP Parag Shah: भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
भाजप आमदार पराग शाहांचा भिकाऱ्याच्या वेषातील रस्त्यावर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला, चार जणांचा मृत्यू; सहा वर्षांच्या मुलालाही गोळी लागली
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंड युनायटेड किंगडमपासून वेगळे होणार? स्वातंत्र्याच्या निर्णयावर सार्वमत होण्याची शक्यता
Manoj Tiwari: भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
भाजप खासदार मनोज तिवारींनी BRICS वर असा एक फोटो शेअर केला की तो डिलीट करून माफी मागायची वेळ आली, नेमकं घडलं तरी काय?
Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं; कोणालाच काही कळेना, चाहते सुद्धा हैराण अन् सामना सुरु होण्याची वेळ सुद्धा लांबली
Embed widget