India vs England 5th Test, Virat Kohli : मागील बऱ्याच काळापासून खराब फॉर्मध्ये असणारा विराट कोहली (Virat Kohli) आजही इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात (India vs England) स्वस्तात तंबूत परतला आहे. 19 चेंडूत 11 धावा करुन विराट आऊट झाला आहे. मॅथ्यू पॉट्स या युवा खेळाडूने कोहलीला त्रिफळाचित केलं. दरम्यान भारताच्या डावाची सुरुवातच खराब झाली असताना मुख्य खेळाडू विराट अशाप्रकारे बाद झाल्याने संघ अजून अडचणीत सापडला आहे. त्यात विराट आजही अपेक्षेप्रमाणे खेळी न करु शकल्याने विराट फॅन्स कमालीचे निराश झाले आहेत.


सामना सुरु असलेल्या या मैदानात भारतीय संघाला आजवर एकदाही विजय मिळवता आलेला नाही. केवळ एक सामना अनिर्णीत सुटला होता, हेच ते काय भारताचं यश. मैदानाच्या या स्थितीमुळेच भारतीय फलंदाज या मैदानात फ्लॉप असून कोहलीने मात्र एका सामन्यात याठिकाणी जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने एका कसोटीत याच मैदानात एका डावात 149 आणि त्याच सामन्यातील दुसऱ्या डावात 51 धावा केल्या होत्या. पण यंदा मात्र तो खास कामगिरी न करु शकल्याने चाहत्यांची मनं तुटली असून विविध पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये काही जण विराटला ब्रेक घे, तर काहीजण कसोटी क्रिकेटमधून निवृत्त हो असे सल्ले देताना दिसत आहेत... यातील काही निवडक पोस्ट्स पाहूया...



  






हे देखील वाचा-