India vs England Test : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात खास झाली नसून पुजारा आणि शुभमन दोघेही स्वस्तात माघारी परतले आहेत. यावेळी आधी शुभमन बाद झाल्यावर विहारीसोबत पुजारा (Cheteshwar Pujara) एक भक्कम भागिदारी उभारेल असे वाटत असतानाच इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) त्याला तंबूत धाडलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेतील सलग पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात अँडरसननेच पुजाराला माघारी धाडलं आहे. या दौऱ्यात पुजारा खास फॉर्ममध्ये नसून अँडरसन त्याची पाठ सोडत नसल्याचंच दिसून येत आहे.


अँडरसन विरुद्ध पुजारा


सध्या सुरु असलेला भारत विरुद्ध इंग्लंड सामना भारताच्या मागील दौऱ्यातील उर्वरीत पाचवा सामना आहे. मालिकेत 2-1 ने पुढे असणाऱ्या भारताची सुरुवात या निर्णायक सामन्यात खराब झाली आहे. यावेळी गिल पाठोपाठ पुजारा बाद झाला असून पुजाराला बाद करणाऱ्या अँडरसननेच या दौऱ्यातील आधीच्या चारही सामन्यांच्या पहिल्या डावात पुजाराला बाद केलं आहे. यावेळी पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात अँडरसनने पुजाराला 4 धावांवर, दुसऱ्या सामन्यात 9 धावांवर, तिसऱ्या सामन्यात एका धावेवर आणि चौथ्या सामन्यात 4 धावांवर बाद केलं. त्यानंतर आजही पाचव्या सामन्यातील पहिल्या डावात अँडरसनने 13 धावांवर पुजाराला तंबूत धाडलं आहे. 


आतापर्यंत सामना


भारत विरुद्ध इंग्लंड या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आहे. सलामीवीर गिल आणि पुजाराने सुरुवात केल्यानंतर सातव्या षटकातच जेम्स अँडरसनने जॅक क्रॉलीमार्फत शुभमनला झेलबाद केलं. गिल 17 धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर पुजारा आणि विहारी एक चांगली भागिदारी करत असतील असे वाटतानाच पुन्हा 18 व्या षटकात जेम्स अँडरसनने जॅक क्रॉलीमार्फतच पुजाराला झेलबाद केलं. पुजारा 13 धावा करुन बाद झाला. त्यानंतर काही वेळातच पाऊस आल्याने 20.1 षटकानंतर भारतीय संघाच्या 53 धावा झाल्या असून 2 विकेट्स पडल्या असताना खेळ थांबवण्यात आला आहे.  


हे देखील वाचा-