India vs England Test, LIVE : आजपासून भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरत आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी सामन्याची नाणेफेक नुकतीच पार पडली आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता इंग्लंडच्या भेद गोलंदाजीचा सामना कऱण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानात उतरणार आहेत. सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा कोरोनाबाधित झाल्यामुळे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. मागील वर्षी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत असताना कोरोनाच्या शिरकावामुळे अखेरचा सामना खेळवता आला नव्हता. हात अखेरचा उर्वरीत कसोटी सामना आता खेळवला जात आहे.

  



दोन्ही संघाच्या अंतिम 11 खेळाडूंचा विचार करता इंग्लंडने आधीच आपले अंतिम 11 खेळाडू जाहीर केले होते. यावेळी जेम्स अँडरसन जो न्यूझीलंडविरुद्ध दुखापतग्रस्त झाला होता, तो पुन्हा संघात परतला आहे. दुसरीकडे भारताने कोणते खेळाडू खेळवणार हे नुकतच जाहीर केलं आहे. यावेळी अनुभवी रवीचंद्रन आश्विनला संघात घेण्यात आलेलं नाही. शार्दूल ठाकूर हा त्याच्या पोजिशनला खेळत आहे. दरम्यान हनुमा विहारीही संघात असल्याचं दिसत आहे. नेमके दोन्ही संघ कसे आहेत, पाहूया...


कसे आहे दोन्ही संघ?


भारताचे अंतिम 11 : चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.  


इंग्लंडचे अंतिम 11 : अॅलेक्स ली, जॅक क्राउली, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.


हे देखील वाचा-