TVS Radeon Launched: दिग्गज दुचाकी उत्पादक TVS ने आपली नवीन 2022 Radeon बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. TVS च्या 110 ES MAG व्हेरिएंटची किंमत 59,925 रुपये आहे. तर DIGI ड्रम ड्युअल टोन व्हेरिएंटची किंमत 71,966 रुपये आहे. रिव्हर्स एलसीडी क्लस्टर विथ रिअल टाइम मायलेज इंडिकेटर (RTMi) या सेगमेंटमध्ये ही बाईक पहिल्यांदा सादर करण्यात आली आहे. नवीन लॉन्च झालेल्या Radeon बाईकमध्ये 109.7cc Dura-Life इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7,000 rpm वर 8.4 PS पॉवर आणि 5,000 rpm वर 8.7 Nm टॉर्क निर्माण करते. याची पेट्रोल टाकीची क्षमता 10 लिटर आहे. मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने दावा केला आहे की, ही बाईक  69 Kmpl मायलेज देईल.


फीचर्स 


नवीन Radeon बाईकच्या फीचर्सबद्दल सांगायचे तर, ग्राहकांना यात USB चार्जरसह सेगमेंटमधील सर्वात लांब सीट मिळते. जी बसण्याच्या दृष्टीने आरामदायक आहे. RTMi फीचरसह रिव्हर्स एलसीडी क्लस्टर वापरकर्त्यांना सवारीच्या परिस्थितीनुसार मोटरसायकलचे मायलेज नियंत्रित करण्यास सक्षम करते. याशिवाय डिजिटल क्लस्टरमध्ये घड्याळ, सर्व्हिस इंडिकेटर, Low बॅटरी इंडिकेटर, टॉप स्पीड आणि सरासरी स्पीड माहिती यांसारख्या 17 इतर फीचर्सचा समावेश आहे.


मायलेज 


या बाईकचे सर्वात महत्त्वाचे फीचर म्हणजे TVS IntelliGo वाहन अधिकवेळ ट्रॅफिक सिग्नल्स आणि इतर थांब्यांवर बराच वेळ निष्क्रिय मोडमध्ये असताना इंजिन बंद करते. त्यामुळे चांगला मायलेज मिळतो. अशा वेळी इंधनाचा अपव्यय आणि उत्सर्जन टाळण्यास हे तंत्र मदत करते.


याच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास, यात प्रीमियम क्रोम हेडलॅम्प, क्रोम रिअर व्ह्यू मिरर, फ्रंट डिस्क ब्रेक आणि स्पोर्टी थाई पॅड डिझाइन आहे. TVS Radeon बेस एडिशन, रिव्हर्स एलसीडी क्लस्टरसह ड्युअल-टोन एडिशन ड्रम, रिव्हर्स एलसीडी क्लस्टरसह ड्युअल-टोन एडिशन ड्रम आणि रिव्हर्स एलसीडी क्लस्टरसह आयएसजी/आयएसएस आणि एका एडिशन डिस्क व्हेरियंटमध्ये एलसीडी क्लस्टरसह ड्युअल-टोन एडिशन अशा चार प्रकारांमध्ये ऑफर केली जाईल. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर, ही बाईक अनेक कलर ऑप्शनसह उपलब्ध असेल.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI