एक्स्प्लोर
Advertisement
धोनीनंतर युवराज सिंगचा आता विराट कोहलीवर निशाणा
मुंबई : महेंद्रसिंग धोनी सध्या इतका व्यस्त आहे की, तो कुणाचेही फोन घेत नाही या शब्दांत टीम इंडियाच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या कर्णधाराची खिल्ली उडवणारा युवराजसिंग आता कसोटी कर्णधार विराट कोहलीवरही घसरला आहे.
भारतीय संघातले काही आजीमाजी क्रिकेटर इतके कंजुष आहेत की, एकत्र शॉपिंगला गेल्यावर ते खिशातच हात घालत नाहीत, असा गौप्यस्फोट युवराजनं केला.
एका रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीत युवीनं भारतीय खेळाडूंच्या कंजुषपणाच्या गोष्टी रंगवून सांगितल्या. पण त्यानं काही ज्येष्ठ खेळाडूंविषयी बोलणं जाणीवपूर्वक टाळलं.
विराट कोहली हा सर्वात कंजुष असल्याचं सांगून युवी म्हणाला की, "खरं तर एकत्र शॉपिंगला गेल्यावर पंजाबी संस्कृतीत कुणीतरी एकचजण सगळ्यांची बिलं भरतो. पण काहीजण त्याला अपवाद असतात. विराट कोहली हा त्यापैकीच एक आहे. हे माझं, हे तुझं म्हणून तो एकमेकांनी खरेदी केलेल्या वस्तू वेगळ्या काढतो आणि त्याच्या वस्तूंचं बिल तेवढं भरतो. त्यामुळं आम्ही दोघं कधी शॉपिंगला गेलो की, मीच दोघांचंही बिल भरतो. त्याला त्याचं एकट्याचं बिल भरू देत नाही."
युवराजच्या या वक्तव्यावर अद्याप विराट कोहलीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे विराटच्या प्रतिक्रियेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement