Virat Kohli : तोचि एक 'विराट'! किंग कोहलीला शतकांच्या फिप्टीसाठी दोन शतकांची गरज, सचिनपासून एक पाऊल दूर
Virat Kohli : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीमधील 48 व्या शतकाची नोंद केली.
पुणे : क्रिकेटमध्ये विक्रमांवर विक्रम रचत असलेल्या किंग विराट कोहलीनं आज पुण्यातील मैदानात पुन्हा एकदा आपल्याला चेस मास्टर (धावांचा पाठलाग) का म्हटले जाते हे दाखवून दिलं. बांगलादेशविरुद्ध वर्ल्डकपमधील चौथ्या सामन्यात आज किंग कोहलीने दमदार नाबाद शतकी खेळी टीम इंडियाला चौथा मिळवून दिला. या विजयाचा शिल्पकार पूर्णतः विराट कोहली राहिला.
Most ODI centuries:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
Sachin Tendulkar - 49.
Virat Kohli - 48*.
- King Kohli's 50th ODI ton in the World Cup will be a dream! pic.twitter.com/rUDglu9FXG
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या शतकांची बरोबरी करण्यासाठी विराट कोहलीला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय वनडे कारकीर्दीमधील 48 व्या शतकाची नोंद केली. सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांचा विक्रम पार करण्यासाठी त्याला अवघ्या एका शतकाची आवश्यकता आहे. त्यामुळे शतकांची फिफ्टी होण्यासाठी अवघ्या दोन शतकांची गरज त्याला असून ते स्वप्न या वर्ल्डकपमध्येच पूर्ण होईल यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही.
Virat Kohli scored a World Cup century against Bangladesh in 2011.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
Virat Kohli scored a World Cup century against Bangladesh in 2023. pic.twitter.com/iXjOvBc5pP
कोहलीने या शतकी खेळीसह आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये 26000 धावांचा टप्पा डावांच्या तुलनेत सर्वात वेगाने पार केला. कोहलीच्या पुढे फक्त आता सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पॉंटिंग हे तीनच खेळाडू आहेत.
HUNDRED BY VIRAT KOHLI....!!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 19, 2023
48th ODI century by King Kohli - the long wait has finally ended at the World Cup for Virat. The GOAT is dominating. pic.twitter.com/Z0yEOWM5L0
कोहलीची फिटनेस आणि फॉर्म पाहता तो निश्चितच दुसऱ्या क्रमांकापर्यंत जाऊन पोहोचेल यामध्ये शंका नाही.
Most International Hundreds among active players:
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
1) Virat Kohli - 78*
2) Joe Root - 46
3) David Warner - 46
4) Rohit Sharma - 45
5) Steve Smith - 44 pic.twitter.com/NFmT7iC8Bf
वर्ल्डकपमधील हे त्याचे आठ वर्षांनी शतक आले. चेस करताना वर्ल्डकपमधील सुद्धा त्याचं पहिलं शतक ठरलं. यापूर्वी 2011 मध्ये सुद्धा वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरोधात कोहलीने शतकी खेळी केली होती आणि आज बारा वर्षांनी बांगलादेशविरुद्ध त्याने शतकी खेळी करत बांगलादेशला अस्मान दाखवले.
Fastest to complete 26000 runs in international cricket:
— Johns. (@CricCrazyJohns) October 19, 2023
Virat Kohli - 577 innings.
Sachin Tendulkar - 601 innings pic.twitter.com/vPcPoUzWx9