एक्स्प्लोर

विजयने स्वत:ला कोंडून घेतलं, मदतीसाठी कार्तिक धावला!

या सामन्यामुळे दिनेश कार्तिक सर्वांच्या लक्षात राहिला. मात्र विजय शंकरलाही कोणी विसरणार नाही.

नवी दिल्ली: दिनेश कार्तिकनं अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकारानं कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना कार्तिकनं सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियानं विजयासाठीचं 167  धावांचं लक्ष्य पार केलं. या सामन्यामुळे दिनेश कार्तिक सर्वांच्या लक्षात राहिला. मात्र विजय शंकरलाही कोणी विसरणार नाही. शेवटच्या सामन्यात शंकरने 17 चेंडूत 19 धावा केल्या. झटपट धावा करण्याची गरज असताना शंकरने संथ फलंदाजी केल्याने तो टीकेचा धनी बनला. तो प्रचंड दबावात होता. जर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, तर शंकरवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असतं. या सर्व परिस्थितीमुळेच सामन्यानंतरही शंकर दबावात होता. त्यामुळेच त्याने स्वत:ला कोंडून घेतलं होतं. जर दिनेश कार्तिकने तो सिक्स मारला नसता, तर काय झालं असतं, हाच विचार शंकरच्या डोक्यात घोंघावत होता. मी इतके बॉल वाया घालवले नसते, तर विजय इतका लांबला असता का?  असे प्रश्न विजयच्या डोक्यात येत होते. "मी दिनेश कार्तिकचा खूप आभारी आहे, मात्र चांगला सामना जिंकून देण्याची संधी मी वाया घालवली याचं वाईटही वाटतं", असं शंकर म्हणाला. शंकरने अंतिम सामन्यानंतर हॉटेलच्या खोलीत स्वत:ला कोंडून घेतलं होतं. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबतची माहिती दिली. "मी खूपच अस्वस्थ होतो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी दरवाजा बंद केला. मात्र माझा दरवाजा ठोठावून दिनेश कार्तिक आला आणि त्यानेच मला धीर दिला", असं शंकर म्हणाला. कार्तिकने मला मनोबल दिलं, त्यामुळेच माझ्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालं, असं त्याने सांगितलं. विजयने 18 व्या षटकात मुस्ताफिजूर रहमानच्या ओव्हरमध्ये सलग चेंडू वाया घालवले होते. त्यामुळे भारताला विजय मिळवणं अतिशय अवघड झालं होतं. मात्र दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 29 धावा करुन, अशक्य वाटणारा विजय खेचून आणला.

महत्त्वाच्या बातम्या

वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
वन डे क्रिकेटमधील 498 धावांचा विक्रम मोडणार, आता 500 धावाही होणार, माजी अष्टपैलू खेळाडूचा खळबजनक दावा
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Virat Kohli On Nana Patekar: नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; विराट कोहली भावूक, पोस्ट करत म्हणाला...
Gopichand Padalkar On Smriti Mandhana: स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...
स्मृती मानधना टीम इंडियाची कर्णधार होताच गोपीचंद पडळकरांची पोस्ट; म्हणाले...

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget