एक्स्प्लोर
आर्वीत भाजीवाल्यांचा बंद, नगराध्यक्ष बनले विक्रेते!
भाजी बाजार बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होतेच आहे, मात्र त्याचसोबत भाजी उत्पादक शेतकऱ्यांनही फटका बसत आहे.
![आर्वीत भाजीवाल्यांचा बंद, नगराध्यक्ष बनले विक्रेते! vegetables market closed in arvi for last 4 days latest updates आर्वीत भाजीवाल्यांचा बंद, नगराध्यक्ष बनले विक्रेते!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/25183531/Wardha-Vegitable.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वर्धा : आर्वी येथे भाजी बाजार भरत असलेल्या इंदिरा चौक परिसरातील जागेवर नगर परिषदेने सौंदर्यीकरण आणि पार्किंग व्यवस्थेसाठी बांधकाम करण्यात निर्णय घेतला आहे. या विरोधात भाजी व्यावसायिकांनी गेल्या चार दिवसांपासून बंद पुकारला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
भाजी बाजार बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होतेच आहे, मात्र त्याचसोबत भाजी उत्पादक शेतकऱ्यांनही फटका बसत आहे.
चार दिवसांपासून भाजी बाजार बंद असल्याने, थेट नगरसेवक आणि नगराध्यक्षच मैदानात उतरले आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी जुन्या बस स्टँडसमोर भाजी विक्री केली. यावेळी नागरिकांनीही गर्दी करत भाजी खरेदी केली. बाजाराचा दिवस असल्याने आज अमरावती येथून भाजीपाला विकण्यासाठी आला होता.
दरम्यान, एकीकडे भाजी विक्रेते हे बेमुदत बंदवर ठाम आहेत, तर दुसरीकडे विक्रेते हे विकास कामात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप नगराध्यक्ष यांनी केला आहे.
विकासकामांचा फटका भाजी विक्रेत्यांना बेरोजगार करणारा ठरत असल्याने आम्ही आमच्या हक्कासाठी लढत असल्याचं भाजी आणि फळ विक्रेत्यांच म्हणणं आहे. पण दोघांच्या भांडणात त्रास मात्र सर्व सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)