IPL 2025 : तेरावं वरीस धोक्याचं! आयपीएलमध्ये मिशा फुटण्यापूर्वीच एन्ट्रीला सज्ज अन् ऑस्ट्रेलियाविरुद्ध 58 चेंडूत शतक ठोकत दिली तगडी झलक

कोलकाताने गेल्या मोसमात आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. राजस्थान रॉयल्सबद्दल बोललो तर त्यांचा पहिला सामना 23 मार्च रोजी आहे. राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

Continues below advertisement

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळवला जाईल. कोलकाताने गेल्या मोसमात आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. राजस्थान रॉयल्सबद्दल बोललो तर त्यांचा पहिला सामना 23 मार्च रोजी आहे. राजस्थानचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. राजस्थानने मेगा लिलावात 13 वर्षांचा खेळाडू वैभव सूर्यवंशीला विकत घेतले होते. वैभवने लहान वयात मोठे पराक्रम केले आहेत.

Continues below advertisement

भारताच्या अंडर-19 संघासाठी चमकदार कामगिरी

वैभवने अनेक प्रसंगी भारताच्या अंडर-19 संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने दमदार कामगिरी केली होती. वैभवने अवघ्या 58 चेंडूत शतक झळकावले होते. वैभवने 19 वर्षाखालील आशिया चषक 2024 मध्येही चमकदार कामगिरी केली होती. श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने भारतासाठी अर्धशतक झळकावले होते. या सामन्यात वैभवने 36 चेंडूंचा सामना करत 67 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

मेगा लिलावात वैभव बनला सर्वात तरुण करोडपती

आयपीएल मेगा लिलावात वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण करोडपती ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले. वैभवची मूळ किंमत 30 लाख रुपये होती. राजस्थानची नजर वैभववर खूप दिवसांपासून होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावण्यासोबतच त्याने आणखी एका सामन्यात त्रिशतकही ठोकले आहे. वैभवने बिहारमध्ये 19 वर्षांखालील स्पर्धेत नाबाद 332 धावा केल्या होत्या.

वैभवची आतापर्यंतची कामगिरी अशी आहे 

वैभवने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याने आतापर्यंत 5 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्याने लिस्ट ए चे 6 सामने खेळले आहेत. या कालावधीत 132 धावा केल्या आहेत. वैभवने लिस्ट ए मध्ये अर्धशतक झळकावले आहे. त्याने बिहारकडून बडोद्याविरुद्ध ७१ धावांची खेळी खेळली. बंगालविरुद्धच्या सामन्यात वैभवने २६ धावा केल्या होत्या.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola