RCB Victory Parade in Bengaluru : आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच जेतेपद पटकावले आणि संपूर्ण देशात जल्लोष सुरू झाला. मात्र या आनंदात एका दुर्दैवी घटनेने सगळ्यांचे काळीज पिळवटून टाकले. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या अफाट गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि या दुर्घटनेत 11 निरपराध चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय (BCCI) लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेणार असून, भविष्यातील विजयी मिरवणुका कशा पद्धतीने आयोजित करायचे यावर नवा आराखडा तयार केला जाणार आहे.

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. 'इंडियन एक्सप्रेस'शी बोलताना सचिव म्हणाले, 'ही घटना आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे. दरवर्षी एक संघ जिंकेल आणि त्यांच्या शहरात सेलिब्रेशन करेल. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आपल्याला यातून शिकावे लागेल. सध्या कोणत्याही फ्रँचायझीच्या विजयी रॅलीवर बीसीसीआयचे कोणतेही नियंत्रण नाही.

सर्व संघांवर लागू होणार नवीन नियम

या अहवालानुसार, आतापासून आयपीएल फ्रँचायझी किंवा कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाच्या रॅलीची जबाबदारी बीसीसीआय घेईल आणि बोर्ड लवकरच नवीन नियम बनवेल. विजेत्या संघाने आपला विजय केव्हा, कुठे आणि कसा साजरा करायचा हे यातून ठरवले जाईल. यामध्ये राज्य सरकारे आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका देखील महत्त्वाची असेल, जेणेकरून हा कार्यक्रम सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडेल. नवीन धोरणानुसार, संघांना आधी बीसीसीआयची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांची योजना आधी सांगावी लागेल अशी शक्यता आहे.

गेल्या वर्षीही गर्दी जमली होती, पण... 

गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने जेतेपद जिंकल्यानंतर कोलकाता येथे झालेल्या विजय रॅलीमध्ये लाखो चाहते जमले होते. त्याचप्रमाणे 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या विजयानंतर, चेन्नई आणि अहमदाबादमध्ये मोठा जल्लोष झाला. अशा रॅलीमध्ये प्रचंड गर्दीमुळे वाहतूक, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होतो.

हे ही वाचा -

RCB Victory Parade in Bengaluru : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरच्या चेंगराचेंगरीचं सगळं खापर एकट्या विराट कोहलीवर फुटलं; BCCI अन् आयपीएलवाल्यांनी हात झटकले

IND Vs ENG Test Series : केएल राहुल IN, सरफराज खान OUT; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी 'ही' असणार टीम इंडियाची प्लेइंग-11