Virat Kohli and Anushka Sharma in Mumbai : बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आयपीएल 2025 च्या विजयानंतर झालेल्या रॅलीमध्ये (RCB Victory Parade in Bengaluru) चेंगराचेंगरीची घटना घडली. 11 जणांना आपला जीव गमवावा लागला आणि 33 हून अधिक चाहते जखमी झाले. आता प्रश्न असा निर्माण होतो की या चेंगराचेंगरीला जबाबदार कोण? 17 वर्षांचा दुष्काळ संपला, पण या आनंदात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. 

गर्दी नियंत्रणात न आल्याने आणि अचानक लोकांची पळापळ सुरू झाल्याने चेंगराचेंगरी झाली. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि मोठा अनर्थ घडला. ही घटना संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त करणारी ठरली आहे.

दरम्यान, बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली विमानतळावर अनुष्का शर्मासोबत दिसला. अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जविरुद्ध विजय मिळवला. त्यानंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ बुधवारी बंगळुरूला गेला. तेथे कर्नाटक सरकारने खेळाडूंच्या सन्मानार्थ एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता, पण अनर्थ घडला.

विराट कोहली बंगळुरूमधून निघाला... 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मासह विमानतळावरून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. ते दोघे मुंबईला परतला आहे. या दु:खद घटनेनंतर विराट कोहली अत्यंत भावनिक झाला. आपल्या भावना व्यक्त करताना त्याने सोशल मीडियावर लिहिलं, "माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. मी पूर्णपणे तुटलो आहे." 

या व्हिडिओत विराट आणि अनुष्का शांततेत, सुरक्षा रक्षकांच्या घेरावात मुंबई एअरपोर्टवर वरून बाहेर येताना दिसत आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर कॅमेरे रोखले असतानाही दोघंही कोणतीही प्रतिक्रिया न देता सरळ गाडी बसले. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला तर 33 लोक जखमी झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ही माहिती दिली.  

हे ही वाचा - 

BCCI on Bengaluru Stampede : बीसीसीआयचा कानाला खडा, यापुढे विजयी मिरवणुका कायमच्या बंद? सर्व संघांवर लागू होणार नवीन नियम