India vs England Test Series : भारताविरुद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने गुरुवारी पहिल्या कसोटीसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने आधीच टीम इंडियाचा संघ जाहीर केला होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली 20  जूनपासून भारतविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ज्यामध्ये जो रूट, ऑली पोप आणि बेन डकेट सारखे वरिष्ठ खेळाडू आहेत. त्याच वेळी, काही तरुण खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे.

जिमी ओव्हरटनचे पुनरागमन...

पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेल्या संघात 14 खेळाडू आहेत. विशेष म्हणजे जिमी ओव्हरटन बऱ्याच काळानंतर पुनरागमन करत आहे. त्याने 2022 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता, आता तो भारतीय संघाविरुद्धही खेळताना दिसू शकतो. जेकब बेथेल, ख्रिस वोक्स आणि ब्रायडन कार्स यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. पण, अलिकडेच झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेल्या कसोटी सामन्यात हे खेळाडू संघाचा भाग नव्हते.

गस अ‍ॅटकिन्सन OUT, जेमी ओव्हरटन IN...

असे मानले जाते की जेमी ओव्हरटनला पहिल्या कसोटीसाठी बोलावण्यात आले आहे, कारण गस अ‍ॅटकिन्सन हॅमस्ट्रिंग स्ट्रेनमुळे बाहेर आहे. इंग्लंड क्रिकेटला आधी वाटले होते की, पहिल्या कसोटीसाठी अॅटकिन्सन वेळेत दुखापतीतून बरा होईल, परंतु तो अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. मार्क वूड आणि ऑली स्टोन गुडघ्याच्या दुखापतीमुळे आधीच मालिकेबाहेर आहेत, तर जोफ्रा आर्चर अंगठ्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीपर्यंत मॅच तंदुरुस्त होणार नाहीत.

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, जेमी ओव्हरटन, जोश टंग, ख्रिस वोक्स.

भारताचा इंग्लंड दौऱ्यासाठी कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक-

पहिली कसोटी- 20-24 जून, 2025 - हेडिंग्ले, लीड्सदुसरी कसोटी- 2-6 जुलै, 2025 - एजबॅस्टन, बर्मिंगहॅमतिसरी कसोटी- 10-14 जुलै, 2025 - लॉर्ड्स, लंडनचौथी कसोटी- 23-27 जुलै, 2025 - ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टरपाचवी कसोटी- 31 जुलै-4 ऑगस्ट 2025 - द ओव्हल, लंडन