US Open 2022: सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यूएस ओपन 2022 स्पर्धेतून (US Open 2022) बाहेर झालाय. नोवाकचा कोरोना प्रतिबंध लस न घेतल्यामुळं त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय.जोकोविचनं कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला विरोध दर्शवत लस घेणार नसल्याचं काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलंय. ज्यामुळं त्याला ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेतही खेळण्याची परवागनी मिळाली नव्हती. अमेरिकेतील कोरोना निर्बंधांनुसार, यूस ओपन स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंनी कोरोना प्रतिबंधक लस घेणं बंधनकारक आहे. जोकोविचनं अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही. यामुळं त्याला या स्पर्धेला मुकावं लागलंय. 


अमेरिकेच्या कोरोना निर्बंधांनुसार, अमेरिकेत दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं कोरोनाची लस घेणं बंधनकारक आहे. जोकोविच लसीकरणाच्या या अनिवार्यतेच्या विरोधात आहे. कोरोनाची लस घ्यायची की नाही? हा त्याचा व्ययैतिक अधिकार आहे. तसेच सरकारनं कोणत्याही व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास सक्ती करू नये, या निर्णयावर जोकोविच ठाम आहे. महत्वाचं म्हणजे, त्यानं अद्यापही कोरोनाची लस घेतलेली नाही.


यूएस ओपनच्या निवेदनात काय म्हटलंय?
महत्वाचं म्हणजे, यूएस ओपननं काही दिवसांपूर्वी महिला आणि पुरुष एकेरी स्पर्धांसाठी खेळाडूंची यादी जाहीर केली होती. या यादीत सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच्याही नावाचा समावेश होता. मात्र, यूएस ओपनच्या निवेदनात असं म्हटलं गेलं होतं की, "यूएस ओपन स्पर्धत लसीकरणाबाबत कोणतीही सक्ती केली जात नाही. परंतु, यूस ओपन अमेरिका सरकारच्या कोरोना निर्बंधांचं पालन करत आहे. ज्यामुळं परदेशातून अमेरिकात दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस घेणं बंधनकारक आहे. 


विम्बल्डन स्पर्धेत जोकोविचची ऐतिहासिक कामगिरी
विम्बल्डन 2022 या स्पर्धेच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसला मात देऊन विजेतेपद पटकावलं  होतं. जोकोविचनं सलग चौथ्यांदा विम्बल्डनचं जेतेपद पटकावण्याचा पराक्रम केलाय. तसेच त्याच्याकडं 21 ग्रँड स्लॅम झाली आहेत. या कामगिरीसह त्यानं रॉजर फेडररला मागे टाकलं आहे.


हे देखील वाचा-