Aurangabad News: शिवसेना जेव्हा-जेव्हा संकटात सापडली त्या-त्यावेळी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्याकडून वेगवेगळ्या देवदेवतांच्या चरणी प्रार्थना केली जाते. सद्या शिवसेना आणि शिंदे गटात सुरु असलेल्या वादात सुद्धा शिवसेनेचाच विजय व्हावा यासाठी खैरे सतत वेगवेगळ्या पूजा करत असतात. तर आता शिंदे गटाचं बंडखोरीचं केंद्रबिंदू ठरलेल्या गुवाहाटीतच खैरे जाऊन पोहचले आहेत. शिवसेनेवरील सर्व संकट दूर व्हावे म्हणून, गुवाहाटीला जाऊन खैरे यांनी कामाख्या देवीला अभिषेक घातला आहे. 


शिवसेना आणि शिंदे गटातील वाद न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची यावर अजूनही शिक्कामोर्तब होऊ शकला नाही. मात्र असे असतांना सत्तेत असलेल्या शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्क्यावर धक्के देणं सुरु आहे. अशा काळात शिवसेनेवरील संकट कमी व्हावे आणि शिवसेना विजयी ठरावी म्हणून चंद्रकांत खैरे यांच्याकडून वेगवेगळ्या देवदेवतांच्या चरणी प्रार्थना केली जाते. तर खैरे यांनी आता शिवसेनेवरची सगळी संकट दूर व्हावं, सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेचा विजय व्हावा यासाठी गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीला अभिषेक, पूजा करत होमहवन केले आहे. 


यापूर्वी अनेकदा केली पूजा...


काही दिवसांपूर्वी खैरे यांच्याकडून एकूण 11 ब्राम्हणांच्या उपस्थित दौलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरात पूजा करण्यात आली होती. अशी पूजा केल्याने आलेले सर्व संकटे दूर होतात. सर्व कार्य आपल्या मनाप्रमाणे होतात अशी भावना आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर कोणत्याही अडचण निर्माण होऊ नयेत आणि शिवसेनेचा विजय व्हावा म्हणून पूजा करण्यात आली होती.तर औरंगाबाद येथे उद्धव ठाकरेंच्या सभेच्या वेळी सुद्धा खैरे यांच्याकडून सलग 7 दिवस दौलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीच्या मंदिरात पूजा आयोजित करण्यात आली होती.  


दानवेंनी घेतली खैरेंची भेट...


विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या अंबादास दानवे यांनी आज चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. मुळात खैरे आणि दानवे यांच्यातील वाद जुना आहे. दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातच विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा शहरात आलेल्या दानवे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमात खैरे यांनी पाठ फिरवली होती. मात्र आत दानवे यांनी आता एक पाऊल मागे घेत खुद्द खैरे यांची भेट घेतल्याची पाहायला मिळत आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: मुंबई पाठोपाठ औरंगाबादेतही शिंदे गट प्रती शिवसेना भवन बनवणार


Aurangabad: कॅबिनेटसोबतच पालकमंत्रीपदही हवं; शिरसाटांच्या भूमिकेने 'भुमरे समर्थक' गोंधळात